विना हेल्मेट २६५१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:28 AM2019-01-09T01:28:07+5:302019-01-09T01:28:40+5:30

समुपदेशनाच्या तासाचा परिणाम : सिंहगड रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या कारवाईत गती

Penal action on non helmet 2651 motorcycle drivers | विना हेल्मेट २६५१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

विना हेल्मेट २६५१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

Next

नऱ्हे : गेले अनेक दिवस झाले विना हेल्मेट दुचाकीचालकांना हेल्मेट नसल्या कारणाने ५०० रुपये दंडात्मक कारवाई होत असून, सिंहगड रस्त्यावरही वाहतूक पोलिसांनी हेल्मेट कारवाईला गती दिली आहे; तसेच हजारो वाहनचालकांना समुपदेशक नोटीसही देण्यात येत आहेत.

वडगाव पूल, नवले पूल; तसेच सावरकर चौक येथे वाहतूक पोलिसांनी दुचाकी वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. मुळात सिंहगड रस्त्यावरील मुख्य रस्ता; तसेच गल्लीबोळांतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यासाठी उपाययोजना म्हणून प्रामुख्याने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे; मात्र याबाबत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती ही वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे, ही खेदाची बाब असली, तरी नागरिकांनीही हेल्मेट वापराबाबत जागृत असले पाहिजे.

सिंहगड रस्त्यावरील कारवाईमध्ये एका आठवड्यात २६५१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे, उपनिरीक्षक सुबराव लाड, आदी कर्मचाऱ्यांनी विना हेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली.

नवले पूल परिसरात चुकीच्या व उलट्या दिशेने येणाºयांवर कारवाई

नवले पूल परिसरात चुकीच्या व उलट्या दिशेने येणाºया वाहनचालकांवर कलम २७९ अन्वये हयगयीने व बेजबाबदारपणे वाहन चालविले म्हणून अनेक दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर सिंहगड पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केले आहेत. दिवसेंदिवस कारवाईची गती वाढविण्यात येणार असल्याची माहिती नºहे पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक घाडगे, उपनिरीक्षक रुपाली पाटील, उपनिरीक्षक माहंगडे, बीट मार्शल शेंडे, मांडे आदींनी कारवाई केली.

हेल्मेटमुळे वाचला जीव; कृपया हेल्मेट वापरा
सध्या हेल्मेटवरून बरेच राजकारण सुरू आहे, त्यातले गणित आम्हा सर्वसामान्यांना माहिती नाही; पण जे कोणी हेल्मेटमुळे अपघातातून बचावले असतील (माझ्यासारखे) किंवा ज्यांनी कोणी हेल्मेट नसल्यामुळे आपल्या आप्तेष्टांना गमावले असेल, ते हेल्मेटचे महत्त्व जरूर समजू शकतात. मोबाईल फुटेल म्हणून स्क्रीनगार्ड वापरणारे आपण, आपल्याला एकच डोकं आहे, जपून वापरूया ही विनंती.
- पुष्कर उज्जैनकर
(हेल्मेटधारक नागरिक)

विना हेल्मेट चालकांना वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर वाहनचालकांना सर्वप्रथम समुपदेशक नोटीस दिली जाते.

त्यानंतर त्यांना शिवाजीनगर मुख्यालयात जाऊन समुपदेशनासाठी हजर राहावे लागते.

त्यानंतर
वाहतूक विभागामध्ये येऊन ५०० रु. दंड आॅनलाईन पद्धतीने भरावा लागतो.

Web Title: Penal action on non helmet 2651 motorcycle drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.