लॉस एंजेलिसमध्ये झळकणार पावसाचा निबंध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:15 PM2018-04-11T13:15:50+5:302018-04-11T13:15:50+5:30

नागराज मंजुळे यांनी तब्बल नऊ वर्षांनी लघुपट दिग्दर्शनात कमबॅक केले आहे. पावसाशी असलेले प्रत्येकाचे अनोखे नाते या लघुपटात दाखवले आहे.

pawasacha nibandh short film release in Los Angeles | लॉस एंजेलिसमध्ये झळकणार पावसाचा निबंध 

लॉस एंजेलिसमध्ये झळकणार पावसाचा निबंध 

Next
ठळक मुद्दे‘पिस्तुल्या’ नंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी ‘पावसाचा निबंध’ हा दुसरा लघुपट दिग्दर्शित

पुणे : पावसाचे आपल्या आयुष्याशी अनोखे नाते निर्माण झालेले असते. प्रत्येकाची पावसाशी जोडलेली एक कहाणी, एक आठवण असते. कधी पाऊस रोमांचक वाटतो तर कधी रौद्ररुप धारण करतो. पावसाशी जुळलेली एका कुटुंबाची, एका गावाची कथा लघुपटातून रंजक पध्दतीने मांडण्याचा अनोखा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट शुक्रवारी (१३ एप्रिल) लॉस एंजेलिस चित्रपट महोत्सवात दाखवला होणार आहे. २५ मिनिटे कालावधीच्या या लघुपटाचे चित्रिकरण मुळशी परिसरात झाले आहे.‘पिस्तुल्या’ लघुपटानंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी ‘पावसाचा निबंध’ हा दुसरा लघुपट दिग्दर्शित केला आहे. ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला मिळालेल्या पारितोषिकांमुळे नागराज मंजुळे हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘फॅन्ड्री’द्वारे मंजुळे यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. ‘सैराट’ या चित्रपटाने यशाची सर्व समीकरणे बदलली आणि नागराज मंजुळे हे नाव एका रात्रीत वलयांकित झाले. त्यानंतर मंजुळे हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटाचे काम सुरु करत असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, बच्चन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले. त्यादरम्यान मंजुळे यांनी ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचे काम पूर्ण केले. पुण्याच्या आसपास मुळशी परिसरात या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. २५ मिनिटे कालावधीच्या या गोष्टीमध्ये मेघराज शिंदे, शेषराज मंजुळे, राही मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. या चारही व्यक्तिरेखांचे पावसाचे आकलन या लघुपटात पाहावयास मिळेल. या लघुपटासाठी संगीत तसेच पार्श्वसंगीताचा वापर केलेला नाही. पावसाचे नैसर्गिक रूप हेच या लघुपटाचे संगीत आहे. 

Web Title: pawasacha nibandh short film release in Los Angeles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.