आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:29 PM2018-07-21T21:29:54+5:302018-07-21T21:31:41+5:30

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Pandharpur railway service start on ocasion of Ashadhi Yatra | आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देहडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, जेऊर, कुर्डूवाडी, याठिकाणी थांबे

पुुणे : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने शनिवार (दि. २१) पासून विशेष रेल्वेसेवा सुरू केली. दि. २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर मुक्ता टिळक व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक गौरव झा आदी उपस्थित होते. पुणे-पंढरपुर मार्गावर डेमु रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी दररोज सकाळी ६.१५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून पंढरपुरकडे रवाना होईल. ही गाडी पंढरपुरमध्ये दुपारी एक वाजता पोहचून दुपारी ३ वाजता पुण्याकडे प्रस्थान करेल. रात्री ८.३५ वाजता गाडीचे पुणे स्थानकावर आगमन होईल.  
ही गाडी हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब याठिकाणी थांबे असतील.

Web Title: Pandharpur railway service start on ocasion of Ashadhi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.