तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:51 AM2018-08-21T02:51:24+5:302018-08-21T02:51:41+5:30

पोलिसांकडून कठोर कारवाई; उजेडाच्या पुढे अंधारात पुन्हा मद्यपींच्या पार्ट्या

Padena light on the palm light | तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश

तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश

Next

वानवडी : भागात केदारीनगर येथील संविधान चौकाच्या येथे काकडे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत रात्री मद्यपी दारू पित पार्ट्या करत बसलेले असतात. त्यावर वचक म्हणून त्या ठिकाणी दिवे बसवण्यात आले आहेत; परंतु दिवे लागले तरी तळीरामांच्या डोक्यात काही प्रकाश पडेना अशी गत झाली आहे.
‘वानवडीतील मोकळे मैदान तळीरामांसाठी बनले बार’ हे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वानवडी पोलिसांनी मद्यपींवर कारवाई केली तसेच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य होत असताना नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी याची दखल घेत मैदानात प्रकाश पडेल असे मैदानाच्या बाजूने असलेले विद्युतदिवे सुरू केले.
मैदानात दिव्यांचा प्रकाश तर पडला; परंतु मैदानात ज्या भागापर्यंत उजेड आहे, त्याच्या पुढे अंधारात आता मद्यपींनी आपल्या दारूच्या पार्ट्या पुन्हा सुरू केल्या आहेत. हवेशीर असलेल्या या मोकळ्या मैदानात अंधाराचा फायदा घेत मद्यपी वानवडी परिसरातील वाईनच्या दुकानातून दारू विकत आणून अंधारात दारू पित पार्टी करत बसलेले असतात. अशातच मोकळी हवा घेण्यासाठी व फेरफटका मारायला आलेल्या नागरिकांना या तळीरामांचा पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे.
केदारीनगर येथे संविधान चौकात जवळपास २० एकरइतकी खासगी मालकीची मोकळी जागा असून, जागेभोवती चारही बाजूने रस्ते असल्याने रस्त्याच्या कडेला पादचाºयांसाठी फिरण्यासाठी पदपथ आहेत. मोकळी जागा असल्याने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोकळी व स्वच्छ हवा मिळवण्यासाठी सकाळ, संध्याकाळ व रात्री वॉकिंगसाठी तसेच फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे या चौकाला चौपाटीसारखे स्वरूप आले आहे.
या मोकळ्या जागेत अर्ध्या भागात झाडेझुडपे आहेत, तर अर्धी जागा ही मोकळी असून, त्या जागी सकाळी-संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व्यायाम, योगा करत असतात, तर मुले खेळत असतात.

केदारीनगर येथील मोकळी जागा असलेल्या काकडे मैदानात विद्युतदिवे लागले असले तरी अंधाराचा आडोसा घेऊन दारू पित पार्ट्या करणाºयांवर महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टच्या कलम ११०, ११७ नुसार आत्तापर्यंत ९० ते १०० वेळा कारवाई करण्यात आली असून, पकडण्यात आलेल्या मद्यपींवर कोर्टाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. तरीही यापुढे हीच कारवाई कठोर करून पेट्रोलिंग वाढविले जाईल, तसेच या ठिकाणी ज्यांच्यावर कारवाई केली आहे, ते मद्यपी येथे न बसता दर वेळी वेगवेगळ्या व्यक्ती येथे दारूपित बसताना आढळल्या आहेत.
- विकास राऊत, सहायक पोलीस निरीक्षक, वानवडी

Web Title: Padena light on the palm light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे