गाण्याच्या वादावरून पबमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:56 AM2018-06-21T01:56:09+5:302018-06-21T01:56:09+5:30

डीजेने टोळीप्रमुखाच्या आवडीचे गाणे लावावे, म्हणून दोन टोळीच्या सदस्यांमध्ये बाचाबाची व तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pab in the pub on the promise of singing | गाण्याच्या वादावरून पबमध्ये हाणामारी

गाण्याच्या वादावरून पबमध्ये हाणामारी

Next

पुणे : डीजेने टोळीप्रमुखाच्या आवडीचे गाणे लावावे, म्हणून दोन टोळीच्या सदस्यांमध्ये बाचाबाची व तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गोळीबार झाल्याचीही चर्चा पबमध्ये होती. पोलिसांकडे तक्रारही आली होती. मात्र, तपासानंतर पोलिसांनी असे काही घडलेच नाही, असे सांगितले.
मुंढवा येथील एफ-बीच नावाने प्रसिद्ध ‘हॉटेल केवायके’ या पबमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला. दरम्यान, टोळीतील वादानंतर या ठिकाणी गोळीबार झाला असल्याचे मुंढवा पोलिसांना फोनद्वारे कळविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रत्यक्ष गेले असता, असा प्रकार झाला नसल्याचे मुंढवा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. दोन्ही टोळींचे प्रमुख शहरातील दिग्गजांचे निकटवर्तीय असल्याने हे प्रकरण दाबण्यात आल्याचे समजते. मुंढवा येथील केवायके पबमध्ये शुक्रवारी लेडिज नाईट असते. लेडिज नाईटच्या दिवशी तरुणींना पबमध्ये मोफत एंट्री दिली जाते. त्यामुळे या दिवशी पबमध्ये मोठी गर्दी असते. शुक्रवारी (१५ जून) शहरातील दोन मोठ्या टोळीचे प्रमुखही पबमध्ये आले होते. त्यातील एकाच्या फर्माईशवरून डीजेने हिअर दी साँग फॉर मिस्टर... असे म्हणत नाव पुकारले. त्यामुळे दुसऱ्या टोळीच्या प्रमुखाला राग आल्याने दोन्ही प्रमुखांची बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती. त्यातूनच चिडलेल्या एकाने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तुलमधून हवेत तीन-चार राऊंड फायर केले. अचानक गोळीबार झाल्याने पबमध्ये गाण्यावर थिरकत असलेल्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली, तर काहींनी पबमधून पळ काढला. वाद मिटण्यापूर्वी एका गटाने पबमध्ये धिंगाणा घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची चर्चा रंगत आहे.
तसेच ज्या टोळीप्रमुखाला घाबरविण्यासाठी गोळीबार करण्यात आला त्याने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून गोळीबार झाल्याची माहिती दिली. मात्र दोन्ही टोळीप्रमुखांचा शहरातील काही बड्या व्यक्तींशी संबंध असल्याने मध्यस्थी करून पहाटेपर्यंत वाद मिटवत प्रकरण रफादफा करण्यात आले. गोळीबार झाल्याचे कळविणाºया टोळीप्रमुखाने पोलीस ठाण्यात जाऊन फक्त बाचाबाची झाल्याची तक्रार नोंदविल्याचे कळते.
>गोळीबार झाला नाही!
दरम्यान, याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी सांगितले, की पोलीस नियंत्रण कक्षाला गोळीबार झाल्याचा फोन आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र गोळीबाराचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. केवळ दुसºयाला त्रास देण्यासाठी खोटा फोन केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिली, म्हणून राजेश चव्हाण याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Pab in the pub on the promise of singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे