अन्यथा रिलायन्स इन्फ्राकडून महामार्गाचे काम काढून घ्या, गिरीश बापट यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:50 AM2017-09-24T04:50:28+5:302017-09-24T04:50:45+5:30

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे.

Otherwise, take off the highway from Reliance Infra, signal of Girish Bapat | अन्यथा रिलायन्स इन्फ्राकडून महामार्गाचे काम काढून घ्या, गिरीश बापट यांचा इशारा

अन्यथा रिलायन्स इन्फ्राकडून महामार्गाचे काम काढून घ्या, गिरीश बापट यांचा इशारा

Next

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ सुरू न केल्यास हे काम रिलायन्स इन्फ्राकडून काढून घ्यावे, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस. डी. चिटणीस आदी प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना बापट यांनी प्रशासकीय अधिकाºयांना दिल्या. रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी -चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरू करण्यात अडथळा येणार नाही.
चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव चाकण-शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ
शकते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे नमूद करून या रस्त्याची स्वत: प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

१५ दिवसांनी घेणार आढावा...
ज्ञानेश्वर व तुकाराममहाराज पालखी मार्गाच्या कामाचा बापट यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी निश्चित करून काम जलद गतीने काम पूर्ण होईल, याचे नियोजन करावे, असेही बापट यांनी सांगितले.

Web Title: Otherwise, take off the highway from Reliance Infra, signal of Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे