पुणेकर चालकांची हेल्मेट वापराकडे पाठ अन् सक्तीलाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:16 AM2018-11-17T03:16:03+5:302018-11-17T03:16:31+5:30

पुणे : शहरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरात विविध रस्त्यांवरील प्रमुख चौकांमध्ये पाहणी ...

Opposition to the helpless use of helicopter of Puneer drivers | पुणेकर चालकांची हेल्मेट वापराकडे पाठ अन् सक्तीलाही विरोध

पुणेकर चालकांची हेल्मेट वापराकडे पाठ अन् सक्तीलाही विरोध

Next

पुणे : शहरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरात विविध रस्त्यांवरील प्रमुख चौकांमध्ये पाहणी केली. या पाहणीमध्ये केवळ १५ ते २० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून आले. हेल्मेट न घातलेल्या अनेकांनी सक्तीच्या निर्णयावर विरोधी मत नोंदविले.

वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही हेल्मेटसक्तीचा प्रयत्न केला होता. पण त्याला तितकाच जोरदार विरोध झाला. कायद्याप्रमाणे हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची, तर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. शहरातील अनेक वाहनचालक हेल्मेटचा वापर करतात. पण त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक वाहनचालकांचा याला विरोध आहे. लोकमत प्रतिनिधींनी स्वारगेट येथे जेधे चौक, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक, दांडेकर पूल चौक, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला आॅफिस चौक, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये काही वेळ थांबून पाहणी केली. या वेळेमध्ये आलेल्या दुचाकीचालकांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये हेल्मेटधारक चालकांची संख्या अगदी तुरळक असल्याचे दिसून आले. त्यामुळे सिग्नलला थांबलेल्या गर्दीत हे चालक ठळकपणे जाणवत होते. एका सिग्नलवर थांबलेल्या ३० ते ४० दुचाकींपैकी केवळ ५ ते ७ हेल्मेटधारक चालक होते. त्यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती. काही ज्येष्ठ नागरिकही आढळून आले. महिलांचे प्रमाण अगदी नगण्य होते.

५०० रुपये दंड मोजावा लागणार...

हेल्मेटसक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित वाहनचालकांकडून त्या-त्या नियमभंंगाचा दंड वसूल केला जात होता.

आता सिग्नल जंपिंग, नो एन्ट्री, राँग वे, विनापरवाना वाहन चालविणे असे नियमभंग करणाºयांना हेल्मेट नसल्याबद्दल देखील दंड भरावा लागणार आहे.
४सध्या शहरात विनाहेल्मेट वाहन चालविणाºयांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.
४विनापरवाना वाहन चालविणाºयांना ५००, नो एंट्री २००, रॉँग साईड २००, फॅन्सी नंबर १००० आणि नो पार्किंगसाठी २०० रुपयांचा दंड आकरण्यात येतो. दुचाकीवरून प्रवास करणाºया दोन्ही व्यक्तींकडे हेल्मेट नसेल तर १ हजार रुपये दंड आहे.

हेल्मेटसक्ती नको...

मी दररोज हेल्मेट वापरतो. परंतु हेल्मेट हायवेला वापरणे आवश्यक आहे. शहरात वाहतूक प्रचंड असल्यामुळे हेल्मेट वापरणे अवघड जाते.
- चंदन भागने

हेल्मेटसक्ती शहरामध्ये नको. त्याची महामार्गावरील दुचाकीस्वारासाठी जास्त गरज आहे. शहरामध्ये हेल्मेट वापरायचे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.
- शेखर कळसकर

हेल्मेटची सक्ती करता कामा नये. ज्याचे त्याला कळले पाहिजे की हे आपल्याच सुरक्षेसाठी आहे पण पुणेकरांना पहिल्यापासूनच हेल्मेटची सवय नाही. हेल्मेटमुळे काही वेळा हॉर्न ऐकू येत नाही त्यामुळे अगोदर लोकांना हॉर्न न वाजवता गाडी चालवण्याची सवय लागली पाहिजे. काही लोकांना हॉर्न वाजवण्याचा आजार असतो.
- विनोद कांबळे

Web Title: Opposition to the helpless use of helicopter of Puneer drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.