बारामती तालुक्यात १५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:20 PM2019-03-15T15:20:10+5:302019-03-15T15:21:47+5:30

तालुका पोलिसांनी मोक्काअंतर्गत १५ गुन्हेगारांवर  कारवाई  केली आहे. यातील १२ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेली मोक्काची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

Operation of the criminals on 15th in Baramati taluka under MCA | बारामती तालुक्यात १५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

बारामती तालुक्यात १५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next

बारामती : तालुका पोलिसांनी मोक्काअंतर्गत १५ गुन्हेगारांवर  कारवाई  केली आहे. यातील १२ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेली मोक्काची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वीदेखील मोक्काची मोठी कारवाई केली होती. या कारवाईचे तालुक्यातून स्वागत होते आहे. 

 उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे गुन्हेगारांना हादरा बसला आहे. मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांपैकी  बेंबट्या अजिनाथ भोसले (रा. झारगडवाडी, ता. बारामती) हा या टोळीचा प्रमुख होता. दत्ता अजिनाथ भोसले (वय ३३), अकबर अजिनाथ भोसले (वय ४२), विज्या अजिनाथ भोसले, सागर अजिनाथ भोसले (सर्व रा. झारगडवाडी, ता. बारामती), गोविंद ऊर्फ गोविंद्या दुर्योधन काळे (वय २०, रा. माळशिरस, जि. सोलापूर), हिंदुराव सयाजी पवार (वय २५, रा. खंडोबामाळ काटेवाडी, ता. बारामती), करण जक्कल पवार (वय २४, रा. झारगडवाडी, ता. बारामती), अक्षय ऊर्फ आकाश कामत काळे (वय ३०, रा. दीपनगर काटेवाडी, ता. बारामती),चैत्री अजिनाथ भोसले (वय ५५, रा. झारगडवाडी ता. बारामती), अश्विनी बेंबट्या भोसले (वय २७, रा. झारगरवाडी, ता. बारामती),  सुनीता दत्ता भोसले (वय ३३, रा. झारगडवाडी, ता. बारामती), मर्दानी अकबर भोसले (रा. झारगरवाडी, ता. बारामती), चांदणी अक्षय पवार (वय २५, रा. झारगडवाडी, ता. बारामती), नीलम करण पवार (वय २०, रा. झारगडवाडी, ता. बारामती) या १५ आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई झाली आहे. यांपैकी बेंबट्या भोसले, नीलम पवार, सागर पवार हे तिघे आरोपी फरार आहेत.

या टोळीकडून सावकारी, अपहरण, दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणे, अतिक्रमण, मारहाण अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करण्यात आले आहेत.  याच आरोपींवर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्येदेखील महाराष्ट्र सावकारी कायद्यासह वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या साथीदारांसह केले आहेत. या प्रकारच्या संघटित गुन्हे यांच्यावर दाखल असल्याने व आसपासच्या गावांतदेखील त्यांची दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणी धजावत नव्हते. बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पुढाकार घेऊन योग्य गुन्हे दाखल केले. या वेळी तालुका स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते

Web Title: Operation of the criminals on 15th in Baramati taluka under MCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.