खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:29 PM2019-05-18T18:29:34+5:302019-05-18T18:39:36+5:30

अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे.

Openly fraud..! Thieves with fake drugs sales in Junnar taluka | खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट..

खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट..

googlenewsNext
ठळक मुद्देअल्प काळासाठी रस्त्यावर,कधी गावातील बाजार तळाच्या रस्त्यावर दुकाने मांडतात.ब्रॅण्डेड औषध कंपन्यांचे लेबल लाऊन बनावट औषध विक्री

ओतूर : जुन्नर तालुक्यात जे महामार्ग व प्रमुख रस्त्यावरील  मोकळ्या माळरानावर अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे. ब्रॅण्डेड औषध कंपन्यांचे लेबल लाऊन बनावट औषध विक्री करण्याच्या गुन्ह्याबरोबर या टोळीमध्ये आता थेट घरात घुसून चोरी करणारे चोर आणि आणि सोन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोने ढापणारे सराईत चोरांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे गावात व बाहेर पालं टाकून आलेल्या लोकांची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
आयुर्वेदिक औषध, विक्रेते आयुर्वेद नावाखाली विविध वनस्पतींची चुर्ण, लाकडाचे रंगी बेरंगी तुकडे छोट्या बरण्या मध्ये भरुन अल्प काळासाठी रस्त्यावर,कधी गावातील बाजार तळाच्या रस्त्यावर दुकाने मांडून बसतात. निरनिराळ्या रोगांची नावे घेऊन त्यांच्यावर रामबाण  औषध त्यांच्याकडे उपलब्ध सांगतात. त्याच्या वाकचातुर्यावर लोक फसतात. विशेषत: गावातल्या साध्या भोळ्या माणसांना त्यांच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवून सुमारे हजारभर रुपयांची औषधे त्यांच्या गळ्यात घालतात. ग्राहकांना फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा त्याच्याकडे जाण्याची सोय नसते. कारण तोपर्यंत त्याने दुसऱ्या गावात त्याचे बस्तान हलविलेले असते व काही दिवसांनंतर त्याच ठिकाणी दुसराच कोणीतरी पुन्हा येऊन तोच व्यवसाय करत असतो.
  या फिरत्या आयुर्वेदिक औषध विक्रेत्याकडे बंदिस्त टेम्पो असून ते जेथे पाल ठोकून राहतात. तेथेच हे  टेम्पो मुक्कामी उभे असतात. ते टेम्पो म्हणजे जणू त्यांचे घरच बनलेले आहेत. 
 काही औषध विक्रेते दुचाकी घेऊन ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर जाऊन ही प्रमाणित नसलेली कंपनी लेबल नसलेली आयुर्वेदिक औषध म्हणून विक्री करून लुट करत आहेत. फसवणूक झालेली आपले हासे होईल म्हणून गप्प बसतात पोलिसांकडे जात नाहीत. त्यामुळे या औषध विक्रेत्यांचे फावले आहे.

Web Title: Openly fraud..! Thieves with fake drugs sales in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.