पुण्यात पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:39 AM2018-01-19T07:39:39+5:302018-01-19T07:39:52+5:30

पुण्यात केलेल्या रॅपिड असेसमेंट आॅफ अव्हॉइडेबल ब्लाइंडनेस अँड डायबेटिक रेटिनोपॅथी सर्वेक्षणानुसार हे आढळून आले, की पन्नाशीच्या पुढील पाचपैकी एक व्यक्ती मधुमेही

One in five people in Pune has diabetes | पुण्यात पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह

पुण्यात पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह

googlenewsNext

पुणे : पुण्यात केलेल्या रॅपिड असेसमेंट आॅफ अव्हॉइडेबल ब्लाइंडनेस अँड डायबेटिक रेटिनोपॅथी सर्वेक्षणानुसार हे आढळून आले, की पन्नाशीच्या पुढील पाचपैकी एक व्यक्ती मधुमेही असल्याचे सर्वेक्षण एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलतर्फे शहरातील अंधत्वाचा अंदाज घेण्याकरिता आणि त्याची कारणे शोधण्याकरिता केले गेले. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये यासाठी २० जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कापसे म्हणाले, या सर्वेक्षणातील निष्कर्ष शहरामध्ये मोतीबिंदूच्या तसेच डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सेवा सुधारण्यासाठी आणि त्यासाठी नियोजन करण्यासाठी वापरले जाणार आहे. यामध्ये सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि पुढीस धोरणांसाठी नियोजन यासंबंधी चर्चा केली जाणार आहे.
कुलकर्णी म्हणाले, मधुमेहीची डोळ्यांसंबंधातील समस्या कायमचे अंधत्व देऊ शकते. हे शोधण्याकरिता आम्ही तपासण्या देखील घेतल्या. २२ टक्क्याहून अधिक जणांना मधुमेह होता आणि त्यातील जवळपास १३ टक्के (दहापैकी एकाहून अधिक) जणांना डायबेटिक रेटिनोपॅथी आढळून आला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यातील दोन तृतीयांशहून अधिक (७० टक्के) जणांनी कधीच डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यांची तपासणी केली नव्हती. सर्वेक्षणामध्ये शहरात ३६०० व्यक्तींचा अभ्यास केला गेला.

Web Title: One in five people in Pune has diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.