शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 04:24 PM2018-11-22T16:24:07+5:302018-11-22T16:27:13+5:30

नदीकाठी शेळ्या चारण्यासाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला.

One death due to electric shock in Shirur taluka | शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देशिरुरच्या पुर्व भागात विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात पसरले जाळे विद्युत तारांमुळे सातत्याने काही ना काही नुकसानकारक घटना

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता.शिरुर)येथील शेळ्या चारण्यासाठी नदीकाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला. दादा हरी केदारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचे पुतणे बापू सोनबा केदारी यांनी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 
सूत्रांनी दिलेली सविस्तर माहितीनुसार,केदारी हे शिरसगाव काटा येथील रहिवाशी असून ते शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी शेळ्या घेवून नदीकाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या काठावर वीजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.शिरुरच्या पुर्व भागात विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. या तारांमुळे सातत्याने काही ना काही नुकसानकारक घटना या अगोदर घडलेल्या आहेत.

Web Title: One death due to electric shock in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.