old aged person arrested who raped three little girls. | तीन चिमुकलींवर बलात्कार करणारा वृद्ध जेरबंद

ठळक मुद्देघरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद

पुणे : परिसरतील तीन चिमुकल्या मुलींना घरात बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ज्येष्ठाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांच्या कोर्टाने त्याची २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 
     याप्रकरणात येरवडा येथे राहणा-या ६५ वर्षीय ज्येष्ठास पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बलात्कार झालेल्या दोन पीडित मुली या दहा वर्षाच्या तर एक ११ वर्षाची आहे. ११ वर्षीय पीडित मुलीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. १९ मार्च आणि त्यापूर्वी दोन महिने आधी हा घाणेरडा प्रकार सुरू होता. आरोपी हा घरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. त्याने तीन चिमुकलींना चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी तसेच पीडित मुलींचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. 


Web Title: old aged person arrested who raped three little girls.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.