अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:13 PM2019-07-10T18:13:53+5:302019-07-10T18:29:41+5:30

अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीसमाेर येत आत्महत्येची धमकी दाेन महिलांनी दिली. याप्रकरणी दाेन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Officers who take action against encroachment threaten | अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी

अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी

पुणे : हडपसर येथील  लक्ष्मी लाॅन्स रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत हाेती. त्यावेळी चहा विक्रेत्या दाेन महिलांनी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विराेध करत स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाची धमकी दिली. तसेच अधिकाऱ्यांना अपशब्द वापरत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चहा विक्रेत्या दाेन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

लता हाके आणि लक्ष्मी हाके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे असून महापालिकेचे अधिकारी राजेश खुडे यांनी हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी आराेपी महिलांना अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून लक्ष्मी लाॅन्स रस्ता, कुमार पॅराडाईज जवळ, मगरपट्टा येथे रस्त्याच्या बाजुला असलेल्या अनधिकृत पथारी लावलेल्या लाेकांवर कारवाई करण्यात येत हाेती. या ठिकाणी आराेपी महिला चहाचा व्यवसाय करत हाेत्या. ज्यावेळी पालिकेचे अधिकारी कारवाई करत हाेते, त्यावेळी आराेपी महिलांनी विराेध केला. तसेच खुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपशब्द वापरुन धक्काबुक्की केली. त्यांच्याबराेबर असलेले पाेलीस शिपाई काेंढाळकर यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. तसेच खुडे यांच्या गाडी समाेर येत स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याची धमकी देखील आराेपी महिलांकडून देण्यात आली. 

याप्रकरणी चहा विक्रेत्या महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पाेलीस करत आहेत. 

Web Title: Officers who take action against encroachment threaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.