महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:53 PM2018-11-13T20:53:47+5:302018-11-13T21:01:14+5:30

रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे.

Now targets of garbage doing in road after spitting by municipal corporation: every time penalty of 180 rupees | महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड 

महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड 

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच सुरू होणार मोहीम सार्वजनिक स्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागतशहरात दररोज नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा मिळून तब्बल २ हजार २०० टन कचरा कचरा फेकण्याचे प्रमाण सकाळी व रात्री जास्तउत्पन्न वाढवणे महापालिकेला अपेक्षित नसून शहर स्वच्छ रहावे हा प्रमुख उद्देश

पुणे: रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना दंड करण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिका आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना लक्ष्य करणार आहे. अशा नागरिकांना १८० रूपये दंड करण्यात येणार आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असून त्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरू आहे. 
रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम दिवाळीत थोडी थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळेच आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. 
 मोळक म्हणाले, कचºयाबाबत थेट सर्वोच्च न्यायालयापासून ते राष्ट्रीय हरित प्राधिकरणापर्यंत महापालिकेवर वारंवार ताशेरे मारण्यात येत असतात. त्यामुळे हा विभाग जागरूक झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा मिळून तब्बल २ हजार २०० टन कचरा शहरात दररोज निर्माण होतो. त्यातील १ हजार २०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाते. ३०० टन कचºयाचे रिसायकलींग केले जाते व ५०० टन कचरा ओपन ग्राऊंडवर डंप केला जातो. स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाºयांकडून घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यात येत असतो. ते पालिकेचे पगारी नोकर नाहीत व त्यांच्या संस्थेला प्रशासकीय खर्चापेक्षा जास्त पैसे दिले जात नाहीत. त्यांना प्रत्येक कुटुंबाने महिना ६० रूपये द्यावेत व ओला तसेच सुका कचरा वेगळा करून द्यावा असे अपेक्षित आहे. तसे होत नाही. त्यांना ६० रूपये दिले जात नाही. कचरा रस्त्यावर फेकला जात असतो. 
यावर उपाय म्हणून आता कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून मोळक म्हणाले, रस्त्यावर कचरा फेकणे हा आपला हक्क असल्यासारखे अनेक नागरिक वागत असतात. कचरा वेगळा करून देत नाहीत. सार्वजनिक ठिकाणच्या कोपºयात कचरा फेकत असतात. त्या सर्वांना शिस्त लागावी यासाठी आता थुंकणाऱ्यांना दंड करण्यात येतो तसाच कचरा फेकणाºयांनाही करण्यात येणार आहे. प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड आकारला जाईल. त्याशिवाय फेकलेला कचरा जमा करून तो कचरा वाहणारी जी यंत्रणा महापालिकेने तयार केली आहे, त्यांच्याकडे द्यायची जबाबदारीही संबधितावरच असेल. अशा यंत्रणेची माहिती त्यांनी करून घेणे अपेक्षित आहे. नसेल तर महापालिका ती त्वरीत करून देण्यास तयार आहे. मात्र यंत्रणा असूनही त्याचा वापरच न करणे हा गुन्हाच आहे व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आरोग्य उपविधीत तशी तरतुदही आहे.
थुंकणाºयांना दंड करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १५ जणांचे एक पथक तयार केले आहे. त्यांचे नेमुन दिलेले काम संपल्यावर दुपारी १२ ते २ या वेळात त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख चौकांमध्ये थांबून सिग्नल वगैरे ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. १५० रूपये दंड करण्यात येतो. लगेच पावतीही दिली जाते. थूंकलेली जागा त्याच्याकडूनच स्वच्छ करून घेण्यात येते. त्यासाठी बादली, फडके महापालिका देते. कचरा फेकण्याचे प्रमाण सकाळी व रात्री जास्त असते. त्यामुळे त्यासाठी तशा पथकांची रचना तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मोळक यांनी दिली. यात पैसे जमा करून उत्पन्न वाढवणे महापालिकेला अपेक्षित नसून शहर स्वच्छ रहावे हा प्रमुख उद्देश आहे असे ते म्हणाले. 
..............
दंड आकारताना संबधितांबरोबर नम्रतेने वागावे, अरेरावी करू नये अशा स्पष्ट सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. त्यांना धडा मिळावा, शरम वाटावी एवढेच यात आहे. आतापर्यंत ४७६ जणांना दंड करून ७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला, मात्र कुठेही, कोणाशीही भांडणे, वादावादी झालेली नाही. उलट संबधितांनीच आता पुन्हा कधीही असे कुठेही थुंकणार नाही असे सांगितले आहे.
ज्ञानेश्वर मोळक, सहआयुक्त, घनकचरा विभाग

Web Title: Now targets of garbage doing in road after spitting by municipal corporation: every time penalty of 180 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.