पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 08:42 PM2019-05-24T20:42:09+5:302019-05-24T20:43:10+5:30

पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणा-या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत ..

the '' nota '' option used by 11 thousands voters In the Pune Lok Sabha elections, | पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर

पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर

Next

पुणे: पसंतीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नसल्याने नन ऑफ द अबव्ह (नोटा)चा वापर करणा-या मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.पुणे लोकसभा मतदार संघात नोटा वापरणा-या मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. यंदा ११ हजार १ मतदारांनी नोटा वापरल्याने चांगलीच हवा निर्माण केली आहे. निवडणूक लढविणारा एकही उमेदवार पसंत नसले तर कोणत्याही उमेदवाराला मतदान न वरील नोटा वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणा-या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत.पुण्याचे भाजपचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८३५ ,क्राँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार २०७ आणि वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना ६४ हजार ७९३ मते मिळाली आहेत. उर्वरित सर्व राजकीय पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांना दीड हजारापेक्षा अधिक मतांचा आकडाही गाठता आला नाही.या उलट नोटाला ११ हजार १ मते मिळाली आहेत.
पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर वाढला आहे.त्यात कोथरूड मतदार संघातील सर्वाधिक २ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोटा वापरला आहे.तसेच टपाली मतदानातही ४१८ मतदारांनी नोटाचा वापर केला.
मावळ मतदार संघात गेल्या लोकसभा निवडणूकीत ११ हजार १७८ मतदारांनी नोटा वापरले तर यंदा १५ हजार ५१६ नोटाला पसंती दिली.मात्र,शिरूर व बारामती मतदार संघातील नोटा मतदारांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत काही प्रमाणात घटली आहे.
------------------
   पुणे लोकसभा मतदार संघातील नोटाचा वापर करणा-या मतदारांची आकडेवारी 
मतदारसंघाचे नाव     २०१४ चे नोटा मतदार        २०१४ चे नोटा मतदार 
वडगावशेरी                   ११९८                                  २०८९        
शिवाजींनगर                १०४८                                   १५५२
कोथरूड                       ११२९                                   २३०७
पर्वती                          १०१६                                  १८६५
पुणे कॅन्टोन्मेंट             ९५१                                   १३२८
कसबा                         ११०१                                 १८३१
------------------------------------------------------------------ 
एकूण                       ५,३१४                  ११,००१

Web Title: the '' nota '' option used by 11 thousands voters In the Pune Lok Sabha elections,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.