एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:17 PM2018-10-23T14:17:20+5:302018-10-23T14:21:34+5:30

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

No water supply one time in day but after day : Municipal corporation | एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

Next
ठळक मुद्देपाटबंधारे विभागाच्या कोट्यात भागविणे अवघडभविष्यात पुणेकरांना मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्टशहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवार (दि.२३) रोजी सर्व पक्षनेत्यांची बैठक

पुणे: दिवाळीनंतर शहराला एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने सोमवारी (दि.२२)रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. परंतु पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. यामुळे भविष्यात पुणेकरांना मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    
  सध्या संपूर्ण पुणे शहराला किमान समान पाणी पुरवठा करण्यासाठी १३५० एमएलडी पाण्याची दररोज गरज असते. परंतु दिवाळीनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने केवळ ११५० एमएलडीच पाणी शहरासाठी देण्यात येणार आहे. यामुळे एक वेळ पाणी पुरवठा करण्याचे ठरले तरी शहरासाठी तब्बल २०० एमएलडीचा तुटवडा निर्माण होतो. उन्हा प्रचंड तडाखा, यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन हे पाहता शिल्लक पाणीसाठा पुढील आठ महिने पुरवावा लागणार आहे. तसेच ११५० एमएलडीमध्ये एक वेळ पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे मत प्रशासनाचे आहे. त्यामुळे भविष्यात एक वेळ ऐवजी दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून, पुणेकारांना पाणी कपातीच्या मोठ्या संकटाला तोड द्यावे लागणार आहे.
--------------
शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणी साठा: टेमघर : ०.८० टीएमसी
वरसगांव : १२.७४ टीएमसी
पानशेत : १०.०५ टीएमसी
खडकवासला : १.३४ टीएमसी
एकूण : २४.९९ टीएमसी
पुणे शहरासाठी राखीव : ११.५० टीएमसी
----------------------
पक्षनेत्यांच्या बैठकीत पाणी कपातीचे नियोजन 
पुणेकरांना पाणी कमी पडू न देण्याची जबाबादारी महापालिकेची आहे. त्यामुळे धरणातून शहरासाठी उपलब्ध होणारे पाण्याचे प्रशासनाकडून योग्य पध्दतीने नियोजन करण्यासाठी सत्ताधारी म्हणून आम्ही सर्व आग्रही आहोत. त्यामुळे शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवार (दि.२३) रोजी सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीसाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत शहराच्या पाणी कपातीचे नियोजन ठरविण्यात येणार आहे.- महापौर मुक्ता टिळक

Web Title: No water supply one time in day but after day : Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.