दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:00 PM2019-03-22T23:00:00+5:302019-03-22T23:00:02+5:30

जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

no Thirst complete after taken double water of pune city | दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी वितरणाचे नियोजन,गळती रोखणे,पुनर्वापरावर भर गरजेचाएका व्यक्तीने दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षितलोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर

पुणे: महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरत आहे. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र, पुढील वीस वर्षांनंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.त्यामुळे पाणी वितरणाचे योग्य नियोजन,पाण्याची गळती व चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.
एका व्यक्तीने अंघोळ,बाथरूम,पिण्याचे पाणी, कपडे, भांडे धुण्यासाठी दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून या नियमाच्या आधारेच पाणी मंजूर केले जाते. पुणे महापालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार पालिकेने दररोज ६३५ दशलक्ष घन मिटर (एमएलडी) पाणी वापरावे अशी अपेक्षा आहे.मात्र,पालिकेकडून १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या,पालिका हद्दीत समाविष्ट होणा-या गावांची संख्या आणि तर ती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असून वाढी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी पालिकेला एक कोटी लोकसंख्येचा आकडा दाखवता येणार नाही.
पालिकेने सप्टेबर २०१७ मध्ये जलसंपदा विभागाला सादर केलेल्या दिलेल्या शपथपत्रामध्ये शहराची लोकसंख्या २०३२ पर्यंत ५२ लाख ७१ लाख होईल,असे नमूद केले होते. त्यावर पालिकेला २०३२ मध्ये १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे होईल,असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र,पालिकेकडून तब्बल १७ टीएमसी पाण्याची मागणी केली जात आहे.परंतु, जुलै २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पालिकेने एकाही महिन्यात सरासरी १३०० ते १३५० एमएलडी पेक्षा कमी पाणी वापरले नाही. त्यामुळे पालिकेकडून नहेमीच मंजूर पाण्याच्या दुप्पटच पाणी वापर होत असल्याचे दिसून येते.परिणामी पालिकेला मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवावी लागणार आहे.त्यासाठी पालिकेने शहरातील जलवाहिन्यातून होणारी पाण्याची चोरी व गळती थांबविणे गरजेचे आहे. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देवून त्याची क्षमता वाढवणे,पाण्याचे वितरण योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.
------------------
पुणे महापालिकेला मंजूर झालेल्या पाण्यात पुणे शहराची तहान भागवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे वितरण नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवण्याचे ठरवले तर पाणी कमी पडणार नाही.मात्र,नियोजनाकडेच दूर्लक्ष होत आहे.
- सुरेश शिर्के ,माजी सचिव,जलसंपदा विभाग


 

Web Title: no Thirst complete after taken double water of pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.