बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:53 PM2018-04-16T18:53:26+5:302018-04-16T18:53:26+5:30

पुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत.

no response to bund garden art plaza | बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत

बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देअार्ट प्लाझाला मिळताेय नगण्य प्रतिसाददाेन वर्षात झाले केवळ तीन ते चार कार्यक्रम

पुणे : एेतिहासिक बंड गार्डन पूल वाहतूकीस बंद करण्यात अाल्यानंतर त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या अार्ट प्लाझा मध्ये करण्यात अाले. या माध्यमातून कलाकारांना एक नवीन व्यासपीठ तयार हाेईल तसेच नवनवीन कलांना प्राेत्साहन मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु चित्र पुरते उलटे असून या अार्ट प्लाझाकडे कलाकारांनी पाठ फिरवली अाहे. या अार्ट प्लाझाचे उद्घाटन मे 2016 ला झाले हाेते. तेव्हापासून अात्तापर्यंत केवळ तीन ते चार कार्यक्रम इथे झाले असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेच्या पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे यांनी दिली. 
    पुण्यातील बंड गार्डन पुलाचे एेतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांच्या काळात ताे बांधण्यात अाला हाेता. हा पूल वाहतूकीस धाेकादायक झाल्याने ताे बंद करण्यात अाला. त्यानंतर या ठिकाणी वाकिंग तसेच अार्ट प्लाझाची निर्मिती करण्यात अाली. पाश्चिमात्य देशांमध्ये असणाऱ्या अार्ट प्लाझांप्रमाणे याची रचना करण्यात अाली अाहे. चित्रकअरांची प्रदर्शने, गाण्यांची कान्सर्टस, एकपात्री कार्यक्रम, पथनाट्ये असे विविध कलाप्रकार या ठिकाणी सादर करता येऊ शकतात. पुलावर हा प्लाझा असल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले अाहे. मात्र हा प्लाझा सुरु झाल्यापासून याला नगण्य असा प्रतिसाद लाभत अाहे. मे 2016 पासून केवळ तीन ते चार कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. एकीकडे परदेशात कलेसाठी निर्माण केलेल्या जागांची अापणी गाेडवी गात असताना अापल्याकडे त्या ताेडिच्या तयार केलेल्या जागेला कलाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. 


    कलाकारांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या अार्ट प्लाझा बद्दल जागृती नसल्याचे हर्षदा शिंदे यांनी सांगितले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप ऊन असल्याने कलाकार या अार्ट प्लाझाकडे पाठ फिरवत असल्याचे त्या म्हणतात. हि कारणे असली तरी पार्कींग तसेच मुख्य शहरापासून हे ठिकाण थाेडे लांब असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कलाकारांचे म्हणणे अाहे. 

Web Title: no response to bund garden art plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.