रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:42 PM2019-03-14T19:42:22+5:302019-03-14T19:54:12+5:30

शिक्षकांकडून शिकायला मिळते, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात.मात्र..,

no Remember to government recruitment of night school vacancies | रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर

रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर

Next
ठळक मुद्देपवित्र पोर्टलच्या प्रक्रियेत नाही समावेश : विद्यार्थ्यांना बसतोय फटकाशिक्षण आयुक्तांनी अपर सचिवांकडे मागणीशासनाच्या २०१७ मधील आदेशाचीच अद्याप अंमलबजावणी नाहीरात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची बाब

- दीपक जाधव -
पुणे : राज्यातील रात्रशाळांमधून दुबार नोकरी करणारे १ हजार ४५६ शिक्षक शासनाने जून २०१७ मध्ये कमी केले. या रिक्त जागांवर कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यासाठी या जागांची पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात रात्र शाळांमधील रिक्त जागांची भरती करण्याबाबत शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. याचा मोठा फटका रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना बसत असून ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत.   
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील १२ हजार रिक्त जागांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राज्य शासनाने सुरू केली आहे. यामध्ये रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या एक हजार जागांचाही समावेश होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून रात्र शाळांमधील शिक्षक भरतीबाबत कुठलाच निर्णय घेतलेला नाही. 
राज्यात १६५ रात्रशाळांमध्ये २५ हजार विद्यार्थी शिक्षक घेत आहेत. या शाळांमध्ये १ हजार ४५६ शिक्षक दुबार नोकरी करीत होते. म्हणजे दिवसा एका शाळेत नोकरी करून पुन्हा ते रात्र शाळेत कार्यरत होते. मात्र शासनाने हे दुबार नोकरीचे धोरण अमान्य करून त्यांची सेवा जूनमध्ये २०१७ पासून समाप्त केली. त्यानंतर या जागांवर काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. तर काही ठिकाणी दुबार शिक्षकच कार्यरत राहिले. मात्र उर्वरित बहुसंख्य शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या. 
शाळेत शिक्षकच शिकवायला येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषत: दहावी-बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांना वर्षभर शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याने त्यांना केवळ स्व-अभ्यास करूनच परीक्षा द्यावी लागली. राज्य शासनाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने त्याअंतर्गत रात्र शाळांमधील रिक्त जागा भरल्या जातील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. 
राज्यातील बहुप्रतिक्षेत असलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर आचार संहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर जाहीर झाली. त्यामध्ये राज्यातील १२ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र यामध्ये रात्र शाळांमधील रिक्त जागांचा समावेशच करण्यात आलेला नाही. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रात्र शाळांना शिक्षक मिळतील याची प्रतिक्षा करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र यामुळे मोठा हिरमोड झाला आहे.  
.....................
रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे. त्यामुळे मंत्रालयस्तरावरून याबाबतची योग्य ती कार्यवाही केली जावी असे पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेले आहे.
...............
स्कूलतर ते वर्गात बसणार कसे?
शिक्षकांकडून शिकायला मिळते, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात. मात्र,  दिवसभर थकून शाळेत आल्यानंतर वर्गात शिक्षकच उपलब्ध असणार नसतील तर शाळेला यायचेच कशासाठी अशी भावना रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. मात्र शासनाकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कुठलीच हालचाल होताना दिसत नाही.
..........................
शासनाच्या २०१७ मधील आदेशाचीच अद्याप अंमलबजावणी नाही
राज्य शासनाने जून २०१७ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली. मात्र त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये रात्र शाळांमधील शिक्षकांना पूर्णवेळ दर्जा देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आदींबाबत आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणीच शिक्षण संचालक कार्यालयाकडून झालेली नाही.
अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाइट 
..........................

Web Title: no Remember to government recruitment of night school vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.