बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 08:25 PM2018-07-23T20:25:42+5:302018-07-23T20:38:22+5:30

रेरा नाेंदणी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास व्यावसायिकावर अनावश्यक कलमे लावणार नसल्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

No criminal case will be registered in case of accident in place of construction: Chief Minister | बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री

बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री

Next

पुणे :  रेरामध्ये नाेंदणी केलेल्या एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा बांधकाम व्यावसायिकांवर लावण्यात येणार नाही, असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिले. लाेकमतच्या विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स काॅफीटेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी लाेकमत एडिटाेरिअल बाेर्डाचे चेअरमन विजय दर्डा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, नॅशनल क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, खासदार संजय काकडे, लाेकमत पुणे अावृत्तीचे संपादक विजय बाविस्कर मंचावर उपस्थित हाेते.


    अापल्या मनाेगतात मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास बांधकाम व्यावसायिकावर सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाताे. परंतु अाज मी सर्व बांधकाम व्यावसायिकांना अाश्वासन देताे की रेरा नाेंदणी असलेल्या एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास, त्याच्याकडे अपघात म्हणूनच पाहण्यात येईल, तसेच  बांधकाम व्यावसायिकावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. त्याचबराेबर कुठलिही अनावश्यक कलमे लावण्यात येणार नाहीत. संरक्षण खात्याच्या काही नियमांमुळे बांधकाम व्यासायिकांना निर्माण हाेणाऱ्या अडचणींबाबतही संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या नावाने एखादा प्रकल्प रखडू नये म्हणून प्राधिकरणाने तसेच न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


    'लाेकमत'बाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, लाेकमतने देशात अापली प्रतिमा तयार केली अाहे. दिल्लीत छापला जाणारा लाेकमत हा एकमेव मराठी पेपर अाहे. लाेकमतचे सर्वात जास्त बातमीदार अाहेत. डिजीटल माध्यमातून माहिती मिळते परंतु प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून लाेकांना ज्ञान दिले जाते. अाम्हाला अाणि बांधकाम व्यावसायिकांना एकत्र पाहिलं की सरकार बांधकाम व्यावसायिकांच्या धार्जीण असल्याचे म्हंटले जाते. परंतु लाेकमतने अाम्हाला एका व्यासपाीठावर अाणून व्यावसायिकांचे प्रश्न सरकारपर्यंत पाेहचविण्याचे काम केले अाहे. 

    या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचे याेगदान असलेल्या मान्यवरांचा लाेकमत महाराष्ट्र लीडरशिप अवाॅर्ड देऊन सत्कार करण्यात अाला. पद्मविभूषण डाॅ. के. एच. संचेती, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बाेर्डे, ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचा गाैरव करण्यात अाला. 

Web Title: No criminal case will be registered in case of accident in place of construction: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.