जर बाहुबली हेल्मेट घालताे, तर अापण का लाजताे ? पुणे वाहतूक विभागाची अनाेखी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:03 PM2018-05-09T19:03:37+5:302018-05-09T19:03:37+5:30

वाहनचालकांमध्ये पुणे वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत अाहे. वाहतूक विभागाकडून पुण्यातील विविध चाैकात वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत.

new way of awareness by pune traffic department | जर बाहुबली हेल्मेट घालताे, तर अापण का लाजताे ? पुणे वाहतूक विभागाची अनाेखी जनजागृती

जर बाहुबली हेल्मेट घालताे, तर अापण का लाजताे ? पुणे वाहतूक विभागाची अनाेखी जनजागृती

Next

पुणे : पुणेरी पाट्यांसाठी पुणेकर जगभर प्रसिद्ध अाहेत. पुण्यातील पाट्या नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधून घेत असतात. स्मार्ट पुणेकरांप्रमाणे अाता पुण्याची वाहतूक शाखाही स्मार्ट झाली अाहे. पुणेकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर पुणेकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. त्यासाठी वाहतूक शाखेने नामी शक्कल लढवली असून विविध चाैकात वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे अनाेखे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. 
    पुण्यात वाढत्या वाहनसंख्येमुळे नियम माेडणाऱ्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले अाहे. त्यामुळे वाहनचालकांंमध्ये जागृती करण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाय केले जातात. नव्याने सीसीटीव्ही द्वारे सुद्धा पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत असल्याने त्याबाबतही वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत अाहे. त्यातच गेल्या अाठवड्यात वाहतूक शाखेकडून सुरक्षित वाहतूक सप्ताह राबविण्यात अाला. या काळात वाहतूक शाखेकडून विशेष माेहिमसुद्धा राबविण्यात अाली हाेती. अाता वाहतूक शाखेकडून विविध चाैकात वाहतूकीबाबत अनाेख्या पद्धतीने जागृती करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांना भावतील अशी वाक्यरचना तसेच फाेटाेंचा वापर करण्यात येत अाहे. 


    पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक अाहे. अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला पुणेकरांनी नेहमीच विराेध केला अाहे. त्यामुळे जास्तीत जास्त दुचाकीचालकांनी हेल्मेट घालावे, हेल्मेट बद्दल त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी यासाठी बाहुबलीतील पात्रांचा वापर करुन जर बाहुबली हेल्मेट घालताे, तर अापण का लाजताे असे वाक्य लिहिण्यात अाले अाहे. त्याचबराेबर गाडी चालविताना फाेनवर बाेलण्याबाबत, सिटबेल्ट लावण्याबाबतही अशाच फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत अाहे. ई-चलानच्या माध्यमातूनही नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून वाहनचालकांवर जरब बसण्यास मदत हाेत अाहे. 

Web Title: new way of awareness by pune traffic department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.