वैद्यकीय अत्यावश्यक सेवेची माहिती असणे गरजेचे : डॉ. ज्ञानेश्वर शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 08:23 PM2018-07-23T20:23:10+5:302018-07-23T20:31:24+5:30

१०८ क्रमांकाच्या विनामूल्य सेवेबाबत जनजागृती करण्यासाठी देशाचे भविष्य असलेला विद्यार्थी जागरुक पाहिजे : ज्ञानेश्वर शेळके

Need to know about medical emergency services: Dr. Dnyaneshwar Shelke | वैद्यकीय अत्यावश्यक सेवेची माहिती असणे गरजेचे : डॉ. ज्ञानेश्वर शेळके

वैद्यकीय अत्यावश्यक सेवेची माहिती असणे गरजेचे : डॉ. ज्ञानेश्वर शेळके

Next
ठळक मुद्देरोटरी क्लब आँफ पुणे साऊथ आयोजित उपक्रमास प्रारंभराज्यातील प्रशिक्षित ४५०० डॉक्टर दिवस रात्र या सेवेत

पुणे : वैद्यकीय सेवेची माहिती शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थी सर्वांनाच असणे काळाची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीत पीडिताला वा रुग्णांना तातडीची गरज मिळावी यासाठी जागृत असे हजारो हात निर्माण झाले पाहिजेत. यासाठी १०८ क्रमांकाच्या विनामूल्य सेवेबाबत जनजागृती करण्यासाठी देशाचे भविष्य असलेला विद्यार्थी जागरुक पाहिजे, असे महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रतिपादन केले.रोटरी क्लब आँफ पुणे साऊथ यांच्या वतीने महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि बी. व्ही. जी. ग्रुप आँफ इंडिया आयोजित कार्यशाळेचे निमित्त होते. 
रोटरी पुणे साऊथच्या वतीने पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेची गरज लागल्यास काय करावे, या प्रशिक्षणाचा शुभारंभ सोमवार पेठ येथील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी येथे रोटरी पुणे साऊथचे माजी जिल्हा प्रशासक प्रमोद जेजुरीकर यांच्या हस्ते  झाला. याप्रसंगी रोटरी पुणे साऊथचे अध्यक्ष मोहन पटवर्धन, अभिजीत जोग, दत्ताजी देवधर, आरपीईएस सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, शिरीष पटवर्धन उपस्थित होते. 
अपघात झाल्यास वा अस्वस्थ वाटत असलेल्या रुग्णांना मदतीसाठी  कोण थांबले आहे हे समजले तर त्याला मानसिक बळ मिळते व धक्क्यातून सावरुन निम्मा बरा होतो. त्यामुळे केवळ बघे न बनता मदत केली पाहिजे. यासाठी १०८ नंबर या विनामूल्य सेवेचा उपयोग करून रुग्णाचे प्राण कसे वाचवायचे याचे प्रात्यक्षिक  डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. मानसिंग साबळे, डॉ.  मेघना जेऊरे, डॉ. अली शेख, डॉ. आशिषकुमार, व तेजस कराळे यांनी सादर केले. बी. व्ही. जी. ग्रुपच्या सहयोगाने राज्यातील प्रशिक्षित ४५०० डॉक्टर दिवस रात्र ही सेवा पुरवित आहेत. याप्रसंगी संजीव महाजन, शिरीष पटवर्धन, प्रमोद जेजुरीकर, मोहन पटवर्धन आदींनीही मनोगत व्यक्त केले. 

Web Title: Need to know about medical emergency services: Dr. Dnyaneshwar Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.