नरेंद्र माेदी यांच्यावरील बायाेपिकला राष्ट्रवादीचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 07:46 PM2019-03-21T19:46:35+5:302019-03-21T19:48:18+5:30

नरेंद्र माेदींवरील बायाेपिकला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाने विराेध दर्शवला आहे. पत्रकाद्वारे हा विराेध दर्शवण्यात आला आहे.

ncp oppose biopic of narendra modi | नरेंद्र माेदी यांच्यावरील बायाेपिकला राष्ट्रवादीचा विराेध

नरेंद्र माेदी यांच्यावरील बायाेपिकला राष्ट्रवादीचा विराेध

Next

पुणे : नरेंद्र माेदींवरील बायाेपिक 'पीएम नरेंद्र माेदी' म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून  आहे. लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने हाेत असल्याने याबाबतची तक्रार प्रशासनाकडे करणार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेस साहित्य -कला- सांस्कृतिक विभागाने या चित्रपटाला विराेध केला आहे. राष्ट्रवादीच्या साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्रकाद्वारे हा विराेध दर्शवला आहे. 

नरेंद्र माेदींवरील बायाेपिकचा ट्रेलर रिलीझ झाला असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित हाेणार आहे. परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्याने त्यात हा सिनेमा प्रदर्शित हाेणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे राष्ट्रवादीकडून म्हणण्यात आले आहे. 

'हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत . तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये असा इशाराही चित्रपट गृहांना देत आहोत .तरीही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी निर्माते ,वितरक ,प्रशासन आणि चित्रपट गृह मालकांची ​ ​राहील 'असे बाबासाहेब पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे . ​

विवेक ओबेरॉय ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे . हा उघड -उघड निवडणूक प्रचाराचा प्रयत्न असून त्याचा खर्च भाजपच्या प्रचारात धरणार का ? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.निवडणूक आयोग या चित्रपट प्रदर्शनाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसला असला तरी आम्ही त्यांना जागे करू ,असेही त्यांनी म्हटले आहे . 

Web Title: ncp oppose biopic of narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.