नवले पूल बनलाय ‘मौत का कुआँ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 03:09 AM2019-01-31T03:09:46+5:302019-01-31T03:09:55+5:30

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष; सिग्नल यंत्रणा नाइलाजास्तव बंद

Naval pool is made 'Death's well | नवले पूल बनलाय ‘मौत का कुआँ

नवले पूल बनलाय ‘मौत का कुआँ

googlenewsNext

- कल्याणराव आवताडे 

नऱ्हे : येथील नवले पुलाखाली असलेल्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले, मात्र उद्घाटनानंतर तीन-चार दिवसांतच ही सिग्नल यंत्रणा बंद ठेवावी लागली.

नवले पुलाखाली वारंवार वाहतूककोंडी होते तसेच येथे अपघातही बऱ्याच वेळेला घडत असतात आणि ह्यात बºयाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांच्या मागणीवरून अखेर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महिला व बालकल्याण सभापती राजश्री नवले यांच्या निधीतून सिग्नलही बसविण्यात आले.

मात्र सिग्नल बसविल्यानंतर तीन-चार दिवसांतच सिग्नल बसविण्या अगोदरपेक्षाही जास्त वाहतूककोंडी होत असल्याने नाइलाजस्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद ठेवून वाहतूक पोलीस स्वत: वाहतूककोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी स्वत: उभे राहून वाहतूक नियोजन करत आहेत. यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपयुक्त तेजस्वी सातपुते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपाययोजना सुचवून त्या पूर्तता करण्याबाबतचे पत्र दिले आहे, यामध्ये नवले पुलाखालून नºहे गावाकडे जाणारा पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता हा सिंगल असून येणारे व जाणारे वाहनासाठी तो रस्ता पुरेसा नाही. नºहे गावातून आलेली वाहने ही पुलाखाली सिग्नलला थांबल्यानंतर वाहनांना रस्ता जाण्यासाठी शिल्लक राहत नाही. तसेच कात्रज बायपासकडून येणाºया वाहनांना नवले पूल गर्दीच्या वेळी अपुरा पडतो.

उपाययोजनांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
दोनच दिवसांपूर्वी मुंबईकडून मांढरदेवीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात याच ठिकाणावर झाला. यात
८ भाविक गंभीर जखमी झाले. नवीन कात्रज बोगदा ते वडगाव पुलादरम्यान महामार्गावर तीव्र उतार असून त्यासाठी तिथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ५० अथवा १०० फुटापर्यंत पांढरे पट्टे करण्याच्या उपाययोजनाही सुचविल्या होत्या, तशा उपाययोजनांचे पत्रही सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिले आहे, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्दे
सिग्नल असून अडचण नसून खोळंबा
जाणाºया - येणाºया वाहनांसाठी पुरेसा सर्व्हिस रस्ता नसल्याने वाहतूककोंडी
सिग्नल चालू ठेवल्यास अधिकच वाहतूककोंडी
नाईलाजास्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बंद ठेवली आहे.
वाहतूक पोलीस कर्मचाºयांवर वाहतूक नियमन करण्याचा ताण वाढतो आहे.
नवले पुलाखाली ३ वाहतूक पोलीस, १ वॉर्डन आणि
१ अधिकारी वाहतूक नियमनासाठी.

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून आम्हाला तशा प्रकारे सूचना मिळाल्या असून येत्या १० दिवसांत नवले पुलाखालील सर्व्हिस रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घेतल्या जातील.
- बी. के. सिंग,
प्रमुख, रिलायन्स इन्फ्रा

आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे लेखी मागणी केली असून, त्याचबरोबर प्रत्यक्षातही आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत. मात्र अजून कामास सुरुवात झाली नाही.
- राजेंद्र काळे
वाहतूक पोलीस निरीक्षक

नवले पुलाखाली सर्व्हिस रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारास सूचना दिल्या आहेत. सूचना देऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही.
- भीमराव तापकीर, आमदार

वाहतूक पोलीस उपायुक्त यांचे पत्र मिळाले असून संबंधित काम हे रिलायन्स इन्फ्राकडे असून त्यांना त्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.
- सोहन निकम, कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग प्रशासन

नवले पुलाखाली होणारी वाहतूककोंडी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक पोलिसांची होणारी धावपळ पाहता प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
- अतुल हेलोंडे, नागरिक

Web Title: Naval pool is made 'Death's well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.