National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 08:07 AM2019-01-12T08:07:57+5:302019-01-12T08:10:01+5:30

जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते.

National Youth Day: 'Pooja' bringing people from the door of death to death by giving help to the victims of the accident | National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा'

National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा'

Next

युगंधर ताजणे 

पुणे : जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील व्यक्तींना तातडीने मदत करणे, त्यांना रुग्णालयात पोहचविण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा आपल्या सहकाºयांच्या मदतीने उभारण्याचे काम ती आनंदाने करते. ‘एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारातून परत आणून वाचविण्याचे समाधानाचे मौल मोठे असते.’ या शब्दांत ती आपल्यावरील जबाबदारीची जाणीव करुन देते. इतकेच नव्हे तर आपल्या मदतशील कार्याचा आदर्श सध्याच्या तरुणाई समोर ठेवते. 

       सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर पुजाने दीड वर्ष एका कंपनीत नोकरी केली. मात्र त्यात तिचे मन काही रमले नाही. पुढे इंटेरियर डेकोरेटरचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला. वडिल गुरुनाथ रामचंद्र साठीलकर यांच्या मदतशील स्वभावाचा प्रभाव पुजावर झाला. वडिलांनी सुरु केलेल्या  ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था’ या नावाने एक व्हाटस ग्रुपमध्ये ती सहभागी झाली. त्यात रोज येणाºया अपघातांची माहिती घेऊन घटनास्थळी धाव घेणे, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे काम ती करु लागली. याकामी तिला तिचा भाऊ शुभम साठीलकर, बहिण भक्ती आणि आईची मोठी मदत झाली. या संस्थेकडे ३ रुग्णवाहिका असून त्या पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावरील कुठल्याही परिसरात अपघात झाल्यास अपघातस्थळी दाखल होतात. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे हा एकमेव उद्देश मनाशी बाळगत ९४ किमी असलेल्या महामार्गाच्या परिसरात प्रभावीपणे काम संस्थेतर्फे केले जाते.

                सध्याच्या सोशल माध्यमांच्या युगात एकमेकांशी यांत्रिकरीत्या संवाद साधण्याची सवय होऊन बसलेल्या पिढीला आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचे काम अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी  पूजा करते. ती म्हणते, महामार्गावर अपघात घडल्यानंतर घटनास्थळी रक्त पाहिल्यानंतर अनेकजण घाबरुन जातात. तर पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी अनेकांची गाळण उडते. आपल्यासमोर मरणासन्न अवस्थेत पडलेला व्यक्ती ज्यावेळी मदतीची याचना करतो तेव्हा त्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी तरुणांनी घ्यायला हवी.अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी  'पूजा'चे वडिल गुरुनाथ साठीलकर यांनी सांगितले, केवळ अपघातापुरते संस्थेचे काम मर्यादित नाही. मागील वर्षी केरळात आलेल्या पुरप्रसंगी देखील आमच्या संस्थेचे २५ सदस्य तिथे मदतीकरिता गेले होते. त्यावेळी त्या भागात सापांचे प्रमाण वाढले होते. पुढील आठवडाभर त्या व्यक्तींनी शर्थीचे प्रयत्न करुन तेथील लोकांना दिलासा दिला होता. पुढील पिढी देखील समर्थपणे मदतशीलतेचा वारसा सुरु ठेवत आहे. याचे मनस्वी समाधान आहे.  

 

नुसतेच फोटो काढण्यासाठी गर्दी नको...

तरुणाई आता नुसतीच मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त असते. आपल्या समोर झालेल्या अपघातात आपलेच घरातील असतील याची शाश्वती आज देता तेणार नाही. कपडे, हात, खराब होतील, पोलीस त्रस्त करतील म्हणून कुणाला मदत नाकारु नका. जो प्रसंग त्यांच्यावर आला आहे तो उद्या तुमच्यावर सुध्दा येऊ शकतो. याचे स्मरण तरुणांनी ठेवण्याची गरज आहे. 

- पूजा साठीलकर 

Web Title: National Youth Day: 'Pooja' bringing people from the door of death to death by giving help to the victims of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.