नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 02:35 PM2019-05-06T14:35:43+5:302019-05-06T14:37:35+5:30

संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला.

Narendra Modi is considered himself more powerful than democracy | नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण 

नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण 

Next

पुणे :संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला. त्यामुळे सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये', असे आवाहन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी रविवारी केले.

दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या  संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे ३४७ वे पुष्प आयोजित करण्यात आले हाेते. सध्याची सामाजिक - राजकीय परिस्थिती आणि आपल्यासमोरील आव्हाने ' या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, 'जात, धर्म यामुळे माणसा -माणसातील अंतर वाढते, आपण माणसातील अंतर कमी केले पाहिजे. जातीच्या अस्मिता कमी झाल्याशिवाय भारतीयत्व मोठे होणार नाही.प्रामाणिकपणाच दूरवर आपल्याला साथ देतो, हा सर्वांचाच अनुभव आहे'.'सत्तेकरता समाजात विभाजन करण्यासाठी द्वेष वाढविला जात आहे. फक्त मोदींना घालवून चालणार नाही, मनुस्मृतीचा पगडा नाहिसा केला पाहिजे',असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्रा.पवार हे  होते.दादासाहेब सोनवणे यांनी स्वागत केले.प्रल्हाद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुजित रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले.लक्ष्मण लोंढे, संदीप बर्वे, प्रसन्न मराठे उपस्थित होते. 

Web Title: Narendra Modi is considered himself more powerful than democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.