प्रेमसंबंधांना विरोध केल्याने शीर केले धडावेगळे : पुण्यातल्या खुनाचे गूढ उलगडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 07:32 PM2018-06-22T19:32:36+5:302018-06-22T19:39:04+5:30

शहरातील कोंढवा भागात सापडलेल्या, शीर नसलेल्या मृतदेहामागचे गूढ उकलले असून  नात्यातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे तरूणाचा धारदार शस्त्राने वार करीत खुन केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. 

The murder mysteries has raveled in Pune | प्रेमसंबंधांना विरोध केल्याने शीर केले धडावेगळे : पुण्यातल्या खुनाचे गूढ उलगडले 

प्रेमसंबंधांना विरोध केल्याने शीर केले धडावेगळे : पुण्यातल्या खुनाचे गूढ उलगडले 

Next
ठळक मुद्देप्रेमसंबंधांना विरोध केल्याने काढला काटा, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून कापले शीर पुण्यातील प्रकार, सहा दिवसात आरोपीला अटक       

पुणे : शहरातील कोंढवा भागात सापडलेल्या, शीर नसलेल्या मृतदेहामागचे गूढ उकलले असून नात्यातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे तरूणाचा धारदार शस्त्राने वार करीत खुन केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.  याप्रकरणी  निजाम असगर हाशमी यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     खडीमशीन चौकाजवळ शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सायंकाळी एकच खळबळ उडाली होती.अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.उमेश भिमराव इंगळे (असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील खडी मशिन चौकाजवळ एका रिकाम्या प्लॉटमध्ये दि. १९ जून रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शीर नसलेले अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. तरूणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे शीर अज्ञाताने कापून नेले होते. त्यामुळे मयत तरूणाची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा होते.

दरम्यान, बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दि. १८ जुन रोजी एक व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल होती. त्यातील व्यक्ती आणि मयत व्यक्तीच्या वर्णनात साम्य असल्याचे दिसून आले.चौकशी केली असता उमेश इंगळे नावाचा तरूण अप्पर रोड, बिलाल मस्जिद जवळ, बिबवेवाडी येथून दि. १६ जुन रोजी सायंकाळी बेपत्ता आहे तसेच उमेशला सर्वात शेवटी निजाम हाशमी याच्यासोबत जाताना पाहिले असल्याची माहिती दिली. 

      उमेश हा प्लबिंग तर निजाम हा स्लायडिंग विंडो बसविण्याचे कामे करीत असत. निजामचे उमेशच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यास उमेशचा विरोध होता. या कारणामुळे त्यांच्यामध्ये भांडणेही झाले होते.  त्यामुळे निजामने त्याचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला.रमजान ईदच्या निमित्त शनिवारी शिरकुर्मा पिवू घालण्याच्या बहाण्याने निजाम उमेशला बाहेर घेवून गेला. दोघेही रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास खडीमशीन चौकाजवळील राजपाल बिल्डर यांच्या रिकाम्या प्लॉटमधील जागेवर बसले होते. यावेळी निजाम याने पाठीमागून उमेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत खुन केला तसेच मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचे शीर कापून घेवून गेला. आरोपी निजाम यास पोलिसांनी अटक केली आहे.  त्याने मयताचे शीर कोठे टाकून दिले अथवा त्याची विल्हेवाट लावली याचा शोध लागलेला नाही . 

Web Title: The murder mysteries has raveled in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.