गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने चुलत्याने केला पुतणीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:06 PM2019-06-23T18:06:45+5:302019-06-23T18:08:26+5:30

गुन्हेगारासाेबत प्रेमविवाह केलेली तरुणीला तू माहेरी येऊ नकाेस असे नातेवाईक सांगत असे. परंतु तरुणी माहेरी येत असे. यातून झालेल्या भांडणातून चुलत्याने तरुणीचा खून केला.

murder of girl in pimpari | गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने चुलत्याने केला पुतणीचा खून

गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने चुलत्याने केला पुतणीचा खून

Next

पिंपरी : गुन्हेगारासोबत घरच्यांच्या परस्पर प्रेम विवाह केला. विवाहानंतर घरच्यांच्या संंमतीशिवाय माहेरी येऊन भांडण करणाऱ्या पुतणीचा चुलत्याने नाडीने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी (दि. २२) रात्री साडे दहा वाजता घडली.

ऋतुजा विकी वाघ असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी छाया विलास भोंडवे (वय ४०, रा दळवीनगर चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रोहिदास भोंडवे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजाने काही दिवसांपूर्वी एका गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केला. यामुळे कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग संतोषच्या मनात होता. प्रेमविवाह झाल्यानंतर ऋतुजा माहेरी यायची. आई तसेच घरच्या व्यक्ती तिला तू येथे येऊ नकोस असे सांगायचे. मात्र ती ऐकत नव्हती. या वादातून ऋतुजांने अनेकवेळा आईला मारहाण केली होती. 

शनिवारी दुपारी ऋतुजा आईकडे आली होती. याचा आई आणि आजीला राग आला होता. त्यातून किरकोळ वाद होऊन त्याचे रुपांतर भांडणामध्ये झाले. तू गुन्हेगारासोबत लग्न केले आहेस, त्यामुळे आमची बदमानी झाली आहे तू इकडे येऊ नको असे म्हटल्यावर ऋतुजाने आईला मारहाण केली. गुन्हेगारासोबत विवाह केल्यामुळे मान, सन्मान गेल्याचा राग संतोषच्या मनात होता. ऋतुजाचे तिच्या आई व आजीसोबत भांडण झाल्यानंतर संतोषने आई व आजीला घराबाहेर काढले. त्यानंतर संतोषने ऋतुजाच्या बेडरुममध्ये जाऊन नाडीने ऋतुजाचा गळा आवळून खून केला. याबाबत ऋतुजाची आई छाया यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीसांनी संतोषला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Web Title: murder of girl in pimpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.