नेटवर्क प्रोब्लेममुळे महापालिकेचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:35 PM2019-02-12T19:35:43+5:302019-02-12T19:40:25+5:30

महापालिकेच्या वतीने ७-८ वर्षांपूर्वी अधिकारी व नागरिकांच्या सोयीसाठी आयडिया कंपनी सोबत करार केला होता.

Municipal Corporation's officers 'Not Rechable' because Network Problems | नेटवर्क प्रोब्लेममुळे महापालिकेचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’

नेटवर्क प्रोब्लेममुळे महापालिकेचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटीत नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक हैराण संबंधित कंपनीची संपर्क करून नेटवर्कचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी

पुणे: नगरसेवक व अधिकारी, कर्मचा-यांना एकमेकांशी संपर्क करण्यासाठी व नागरिकांची कामे करणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने आयडिया कंपनी सोबत करार करून तब्बल १ हजार मोबाईल सिम कार्ड घेण्यात आली. गेल्या सात-आठ वर्षांपासून महापालिकेचे सर्व अधिकारी प्रमुख आयडियाचे सिमकार्ड वापरत असून, सध्या आयडियाच्या नेटवर्क प्रोब्लेममुळे अधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. स्मार्ट सिटीत नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. 
महापालिकेच्या वतीने ७-८ वर्षांपूर्वी अधिकारी व नागरिकांच्या सोयीसाठी आयडिया कंपनी सोबत करार केला होता. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून अधिका-यांना फोन केल्यावर तुम्ही कॉल केलेली व्यक्ती कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे.असे ऐकावे लागते . महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये काही ठराविक अधिका-यांच्या कार्यालयामध्ये मोबाईलची रेज येत असून, सावरकर भवनमध्ये तर संपूर्ण इमारतींमध्येच आयडीयाच्या कार्डला रेज मिळत नसल्याचे अधिका-यांनी सांगितले. यामुळे अधिका-यांसह त्यांना फोन करणारे नगरसेवक व नागरिक देखील हैराण झाले आहे. 
याबाबत क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, संबंधित कंपनीची संपर्क करून नेटवर्कचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. तसेच स्मार्ट सिटी नेटवर्क मिळत नसल्याने पुण्यासाठी भूषषावह नसल्याचे देखील खर्डेकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Municipal Corporation's officers 'Not Rechable' because Network Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.