मुंबई -सोलापूर एक्सप्रेस आता गदगपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:46 PM2018-03-13T14:46:01+5:302018-03-13T14:46:01+5:30

मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.

Mumbai -Solapur Express now at Gadag | मुंबई -सोलापूर एक्सप्रेस आता गदगपर्यंत

मुंबई -सोलापूर एक्सप्रेस आता गदगपर्यंत

Next
ठळक मुद्दे* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द 

पुणे : मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.तसेच या गाडीचा नंबरही बदलण्यात आला आहे़. त्याचवेळी सोलापूर -विजापूर -सोलापूर ही सप्ताहातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे़. 
मुंबई ते सोलापूर (२२१३९/२२१४०) एक्सप्रेसचा नंबर आता १११३९/१११४०) हा राहणार आहे़ .छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून ही एक्सप्रेस (गुरुवार वगळता) १६ मे २०१८ पासून दररोज रात्री २१़.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी गदगला पोहचेल . गदगहून ही गाडी १७ मे २०१८ पासून दररोज (शुक्रवार वगळता) दुपारी १३़.४० वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ५़.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचणार आहे़ . ही गाडी दादर, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, कुर्डवाडी, सोलापूर, विजयपुरा आणि बागलकोटला थांबेल़. या गाडीला १ वातानुकुलित प्रथम श्रेणी २ टीयर, २ वातानुकुलित ३ टीयर, ४ शयनयान, ५ सामान्य व्दितीय श्रेणीचे डबे असतील़. या गाडीचे आरक्षण १५ मार्चपासून सर्व आरक्षण केंद्रांवर व वेबसाईटवर १२० दिवस अगोदर सुरु होत आहे़. 
़़़़़़़़
* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .
* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द 

Web Title: Mumbai -Solapur Express now at Gadag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.