पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग गुरुवारी दुपारी दोन तास बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:32 PM2019-03-27T16:32:58+5:302019-03-27T16:40:41+5:30

पुण्याकडून मुंबईकडे जाताना पनवेल एक्झीटच्या (बोगदा संपतो तिथे) जवळ असलेल्या धाटणच्या ठिकाणी कमान बसविण्यात येणार आहे.

The Mumbai- pune Highway closed for two hours on Thursday | पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग गुरुवारी दुपारी दोन तास बंद 

पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग गुरुवारी दुपारी दोन तास बंद 

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २ तासाचा मेगा ब्लॉक असणारपुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार

पुणे : पुणे - मुुंबई  द्रुतगती महामार्गावर कमान बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबईमहामार्गावरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) दि. २८ मार्च रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन राज्य वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. 
प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग खालापूर टोल -खालापूर फाटा - महामार्ग क्रमांक ४ मार्गे चौक फाटा - दौंड फाटा - शेडुंग टोल - अजिवळी फाटा - परत -पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग असा राहणार आहे़. सर्व प्रवासी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा़ या काळात अवजड मालवाहू वाहनांना द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलचे मागे (फुड मॉलजवळ) थांबवून ठेवण्यात येणार आहे़. 
नेमके कुठे बसविण्यात येणार आहे.

पुण्याकडून मुंबईकडे जाताना पनवेल एक्झीटच्या (बोगदा संपतो तिथे) जवळ असलेल्या धाटणच्या ठिकाणी कमान बसविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २ तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे. अशी माहिती राज्य महामार्ग पोलिस विभागातील मुख्यालयातील पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.

Web Title: The Mumbai- pune Highway closed for two hours on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.