शिवाजीनगर येथे चाकूचा धाक दाखवून मोटार पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 07:03 PM2018-07-13T19:03:18+5:302018-07-13T19:05:30+5:30

प्रवाशाची वाट पाहात थांबलेल्या उबेरच्या कारचालकाला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कार पळविली.

motor theft by a showing fear of knife at Shivajinagar | शिवाजीनगर येथे चाकूचा धाक दाखवून मोटार पळविली

शिवाजीनगर येथे चाकूचा धाक दाखवून मोटार पळविली

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजीनगर पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार

पुणे : प्रवाशाची वाट पाहात थांबलेल्या उबेरच्या कारचालकाला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कार पळविली. शिवाजीनगर येथील सिमला आॅफिस चौकात आकाशवाणीजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. 
       शिवाजीनगर पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी गोविंद खांडेकर (वय ३६, केसनंद फाटा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडेकर यांच्याकडे स्विफ्ट डिझायनर कार आहे. ती त्यांनी उबेर कंपनीला जॉईन केली आहे. गाडीचे आॅनलाइन बुकींग झाल्यानंतर प्रवाशाने सांगितल्या ठिकाणी ते पोहचतात. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास खांडेकर यांना एका प्रवाशाला शिवाजीनगर येथील आकाशवाणी येथून घेऊन जायचे होते. त्यावेळी ते प्रवाशाची वाट पाहत शिवाजीनगर येथील आकाशवाणी केंद्राजवळ उभे होते. त्यांच्याजवळ तीन जण दुचाकीवरून आले. त्यांनी खांडेकर यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या कारसह पसार झाले. कारमध्ये असलेले दोन मोबाइलही त्यांनी पळविले. खांडेकर यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. 

Web Title: motor theft by a showing fear of knife at Shivajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.