बारामती तालुक्यात मुलीचा खून करून आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 09:59 PM2019-06-15T21:59:42+5:302019-06-15T21:59:59+5:30

आईने पोटच्या दहा वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून मुलीचा खून करत स्वत:गळफास घेत आत्महत्या केली.

Mother committed suicide by killing her daughter in Baramati taluka |  बारामती तालुक्यात मुलीचा खून करून आईची आत्महत्या

 बारामती तालुक्यात मुलीचा खून करून आईची आत्महत्या

Next

वडगाव निंबाळकर: आईने पोटच्या दहा वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून मुलीचा खून करत स्वत:गळफास घेत आत्महत्या केली. बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या हद्दीत शनिवार (दि.15) सकाळी दहाच्या    सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव असुन साक्षी नवनाथ जाधव वय १० असे विष पिल्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. सुरेखा लग्नानंतर काही दिवसातच पतिपासुन वेगळी झाली. आपल्या मुलीसह माहेरी राहत होती. शुक्रवारी घरातील सर्व बाहेर असल्याचे निमित्त साधुन राहत्या घरातील एका खोलीत माय लेकर रात्री झोपली होती. घरातील लोक बाहेरून आली त्यावेळी दोघेही झोपले होते. रात्रीच्या वेळी मुलीला पाण्यामध्ये विष देउन आई सुरेखाने खून केला. यानंतर स्वत: छताच्या घरातील अँगलला साडी बांधुन गळफास घेतला. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्व उठले तरी त्यांच्या खोलीतून काही आवाज येत नसल्याचे पाहुन दार वाजवले पण प्रतिसाद आला नाही. दरवाजा काढुन आत पाहिले असता मुलगी मृत आवस्थेत तर आईने गळफास घेतल्याचे दिसुन आले. शेजारी एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती. की मी कँन्सरच्या आजाराला कंटाळले आहे. माझ्या पश्चात मुलीचे हाल होउ नयेत यासाठी आम्ही दोघेही देवाघरी जात आहे. याबाबत कोणालाही दोषी ठरवु नये घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देउन पहाणी केली. यावेळी विषारी औषधाची बाटली आणि चिठ्ठी आढळुन आली. याबाबत सचिन बाबुराव शिंदे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मयत सुरेखा हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वडगाव निंबाळकर पोलिसठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.
 

Web Title: Mother committed suicide by killing her daughter in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.