एकपडदा चित्रपटगृहांना घरघर, शासनाची उदासीनता कायम, मल्टिप्लेक्सची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:42 AM2017-12-02T03:42:24+5:302017-12-02T03:42:34+5:30

आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 Monopoly cinemas, increasing government's apathy, increase the number of multiplexes | एकपडदा चित्रपटगृहांना घरघर, शासनाची उदासीनता कायम, मल्टिप्लेक्सची संख्या वाढतेय

एकपडदा चित्रपटगृहांना घरघर, शासनाची उदासीनता कायम, मल्टिप्लेक्सची संख्या वाढतेय

googlenewsNext

पुणे : आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे. प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपट पाहण्यासाठीही मल्टिप्लेक्सला पसंती देत असल्याने चित्रपटांच्या ‘अच्छे दिन’चा एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायाला काहीच लाभ झालेला नाही.
सध्याच्या मल्टिप्लेक्स संस्कृतीमध्ये एकपडदा चित्रपटगृहांसमोरील अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. मल्टिप्लेक्समध्ये करमणूक क्षेत्रातील उद्योगसमूह पैसे गुंतवत आहेत. त्या तुलनेत एकपडदा चित्रपटगृहचालकांकडे चित्रपटाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पैसे नाहीत, हे वास्तव आहे. प्रेक्षकवर्ग फिरकत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहचालकांना हा व्यवसाय परवडत नाही.
मात्र, शासनाच्या नियमानुसार, एकपडदा चित्रपटगृहचालकांनी दुसºया व्यवसायामध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्यास त्यांना सध्याच्या तुलनेत एक तृतीयांश आसनव्यवस्थेचे चित्रपटगृह विकसित करावे लागते.
जागा विकसित करण्यासाठी, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळावा, अशी मागणीही सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.

५४ स्क्रीन वाढणार
एकीकडे एकपडदा चित्रपटगृहे अनेक समस्यांचा सामना करीत असताना दुसरीकडे मल्टिप्लेक्सची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या २३ मल्टिप्लेक्स असूून, ११६ स्क्रीनच्या माध्यमांतून प्रेक्षक चित्रपटांचा आनंद लुटत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच दहा प्रस्तावित मल्टिप्लेक्सची भर पडत असून, त्याद्वारे ५४ स्क्रीन वाढणार आहेत.

१ विजय थिएटरचे दिलीप निकम म्हणाले, ‘गेल्या महिन्याभरात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी एकपडदा चित्रपटगृहांचा व्यवसाय वाढलेला नाही. अनेकदा चित्रपटगृहे रिकामी असल्याचेच चित्र पाहायला मिळते. चांगल्या चित्रपटांमुळे आपल्या चित्रपटगृहांवर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
२ इतर वेळच्या तुलनेत १० टक्केही लाभ झालेला नाही.’ चित्रपटगृहांच्या नूतनीकरणामध्ये अडचणी येतात. अनेक चित्रपटगृहांच्या इमारती जुन्या आणि मध्यवर्ती भागात आहेत. या जागा विकसित करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही.
३ एफएसआयचा अभाव, रहदारी, पार्किंगचा प्रश्न आदी समस्या ‘आ’वासून उभ्या आहेत. एकपडदा चित्रपटगृहांचे रुपांतर मल्टिप्लेक्समध्ये करायचे झाल्यास जागेची उपलब्धता ही मोठी अडचण ठरते. अनेकदा शासनाकडे अर्ज करून, पालकमंत्र्यांची भेट घेऊनही दखल घेतली जात नसल्याने एकपडदा चित्रपटगृहमालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये एकपडदा चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागलेला नाही. चांगला चित्रपट आला, की प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहतात. त्यामुळे एकपडदा चित्रपटगृहांकडे ते फिरकताना दिसत नाहीत.
उत्तम आणि आरामदायी आसनव्यवस्था, चकचकीत आणि भव्य स्क्रीन, प्रेक्षकांना आल्हाददायक वाटणारी वातानुकूलित यंत्रणा यामुळे प्रेक्षक तिकडेच वळताना दिसतात.
उत्पन्नाची मर्यादा कमी असल्याने एकपडदा चित्रपटगृहांमध्ये या सुविधा देणे शक्य होत नाही.
सध्या पुण्यामध्ये १६ एकपडदा चित्रपटगृहे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये १५ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत.

Web Title:  Monopoly cinemas, increasing government's apathy, increase the number of multiplexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.