एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:00 AM2019-07-03T07:00:00+5:302019-07-03T07:00:04+5:30

पुणे शहरातील सीमाभिंती कोसळून आतापर्यंत २१ कामगारांचा बळी गेला आहे.

mokka act builders who one more than unauthorized construction: The corporation's decision | एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय 

एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय 

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्र देण्यात येणारगेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढलेली शहरभरातील बांधकाम साईट्सवरील लेबर कॅम्प्स आणि सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडतीस सुरुवात

पुणे : सीमाभिंती कोसळून आतापर्यंत २१ कामगारांचा बळी गेला असून महापालिकेने शहरभरातील बांधकाम साईट्सवरील लेबर कॅम्प्स आणि सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने आपला मोर्चा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडेही वळविला असून यापुढे एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. 
गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील सीमाभागामध्ये ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली आहेत. पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. ही बांधकामे अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही स्वरुपाची आहेत. यातील बहुतांश बांधकामे अनधिकृतच असतात. गुंठेवारीत अनधिकृत बांधकामे करणारे व्यावसायिक  ग्रामपंचायत सॅक्शन्ड अशा गोंडस नावाखाली ग्राहकांना घरे विकत आहेत. 
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहिम उघडण्यात आली आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून कोंढवा परिसरावर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले होते. या भागातील अनधिकृत बांधकामांची जंत्रीच बांधकाम विभागाने तयार केली आहे. गेल्या तीन-चार महिन्यात पालिकेकडून तब्बल ३० बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. परंतू, गुन्हे दाखल करुनही काही व्यावसायिक बधत नसल्याचे पालिकेच्या पाहणीमध्ये समोर आले आहे. 
त्यामुळे अशा बेदरकार बांधकाम व्यावसायिकांना चाप लावण्यासाठी पालिकेने पोलिसांचे हत्यार वापरण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा नोटीस देऊन अथवा गुन्हे दाखल करुनही जे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अनधिकृत बांधकाम करतील त्यांच्यावर यापुढे थेट मोक्का लावण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम करणे कायद्याने गुन्हा असून नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. या अनधिकृत बांधकामात अनेकजण सहभागी असतात. त्यामुळे हा संघटीत गुन्हेगारीसारखाच प्रकार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकेल असा अंदाज अधिकारी व्यक्त करीत आहेत. 
====
शहराभोवती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत. आम्ही काही दिवसांपासून कोंढव्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन-चार महिन्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून जे व्यावसायिक एकापेक्षा अधिक वेळा अनधिकृत बांधकामे करतील त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. 
- प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग

Web Title: mokka act builders who one more than unauthorized construction: The corporation's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.