मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:39 AM2019-04-23T11:39:02+5:302019-04-23T11:41:10+5:30

पुण्यातील काही केंद्रांवर मोबाईल मतदान खोली बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत आहे तर काही ठिकाणी मोबाईल बंद करण्यास सांगण्यात येत आहे. 

mobile using ban between voting session | मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

googlenewsNext
ठळक मुद्देमागच्या टप्यातील मतदानात एका मतदाराने मतदान करतानाचे केले होते थेट फेसबुक लाईव्ह

पुणे : मतदान करताना फेसबुक लाईव्ह केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मतदान खोलीत मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. पुण्यातील काही केंद्रांवर मोबाईल मतदान खोली बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत आहे तर काही ठिकाणी मोबाईल बंद करण्यास सांगण्यात येत आहे. 
तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पुण्यासह, बारामती, सातारा, सांगली या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे. मागच्या टप्यातील मतदानात एका मतदाराने मतदान करतानाचे थेट फेसबुक लाईव्ह केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. काही मतदारांनी मतदान करतानाचे फोटो देखील सोशल मीडिया वर अपलोड केले होते. मतदान हे गुप्त असते. असे असताना मतदान करतानाचे फेसबुक लाईव्ह केल्याने गुप्ततेच्या भंग झाला होता. त्यामुळे आता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. 
दरम्यान, पुण्यात शांततेत मतदान सुरु असून, मतदानासाठी नागरिक गर्दी करत आहेत. शहरातील विविध भागात नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. आयटी कर्मचारी ज्यांना सुट्टी नव्हती त्यांनी सकाळी मतदान करून आपली कार्यालये गाठली.

Web Title: mobile using ban between voting session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.