MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:37 PM2018-09-25T16:37:09+5:302018-09-25T16:39:31+5:30

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे.

MIM support to prakash ambedkar, but ambedkar Will wait for Congress | MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच'

MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच'

Next

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. महाराष्ट्रातही हीच तयारी सुरू असून एमआयएम पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपसोबत आघाडी करू इच्छित आहे. याच संदर्भात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आंबेडकर यांची निवासस्थानी भेट घेतली. 

जलील यांच्या आमंत्रणावर आंबेडकर यांनी 'माझे काँग्रेससोबत बोलणे सुरू आहे. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसून त्यानंतर उत्तर देईन' असे उत्तर दिल्याचे समजते. मात्र येत्या दोन ऑक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या एमआयएमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

या भेटीविषयी जलील म्हणाले की, बहुजन वंचित आघाडीमध्ये अनेक बहुजन मग दलित असो मुसलमान असो किंवा इतर सगळ्यांनी  एकत्र यावे असं आम्हाला वाटते. या आघाडीचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे अशी आमची इच्छा आहे. यापुढील दिशा काय असेल आंबेडकर  आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मिळून ठरवतील. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसचे भारिपला काय उत्तर येईल त्यावर एमआयएम-भारीपचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: MIM support to prakash ambedkar, but ambedkar Will wait for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.