पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:06 PM2019-02-09T18:06:16+5:302019-02-09T18:10:25+5:30

प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे

Metro will early start in pune : Chief Minister Devendra Fadnavis | पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देपुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन येत्या काळात पाच मिनिटात पीएमपी बस उपलब्ध होईलनॉन एसी च्या भाड्यात पुणेकरांना एसी बसने फिरता येणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. त्या मिशन संदर्भात पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहे. तसेच त्या मिशनमधील एक महत्वाचा घटक असलेली पुण्याच्या मेट्रोचे काम देखील प्रचंड वेगात सुरु आहे. त्यामुळे पुणेमेट्रो वेळे आधी सुरू होईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
पुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, मानवसंसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शहरांमुळे जीडीपी वाढते. शहरात सर्व सुविधा मिळायला हव्यात हे लक्षात घेऊन स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच काम लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे. पुणे हे वाहनांचा आगार झाले आहे. वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे. आणि त्यासाठी इंटिगरेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम तयार करण्यात येत आहे. पुण्यात मेट्रो चं जाळ निर्माण होत आहे. ५ मिनिटाहुन अधिक वेळ बसची वाट पाहावी लागली नाही तरच लोक बसने प्रवास करतील. त्यामुळे येत्या काळात पाच मिनिटात बस उपलब्ध होईल.
पीएमपी ने १५०० बसेस पारदर्शक पद्धतीने खरेदी केल्या आहेत. नॉन एसी च्या भाड्यात पुणेकरांना एसी बसने फिरता येणार आहे. स्वारगेट मध्ये सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सिस्टिम ला सामावून घेण्यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभे राहणार आहे. सिंगल आप आणि सिंगल तिकीट यंत्रणा उभी करायची आहे.

Web Title: Metro will early start in pune : Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.