केपीच्या ज्युदोपटूंची पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:45 AM2018-01-02T02:45:39+5:302018-01-02T02:45:53+5:30

राज्य शासन संचलित क्रीडा प्रबोधिनीच्या ज्युदोपटूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली.

 The match for KP judges | केपीच्या ज्युदोपटूंची पदकांची लयलूट

केपीच्या ज्युदोपटूंची पदकांची लयलूट

Next

पुणे : राज्य शासन संचलित क्रीडा प्रबोधिनीच्या ज्युदोपटूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली.
नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी (पुणे-अमरावती) ज्युदोपटूंनी एकूण १३ पदके
जिंकून उपविजेतेपद संपादन केले. मुंबई संघाने विजेतेपद
आपल्या नावावर केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्तखेळाडूंची १७ ते २१ जानेवारी जालंधर (पंजाब) येथे होणाºया
कॅडेट व ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा प्रबोधिनी पदकविजेते खेळाडू असे : कॅडेट वयोगट १५ ते १८ वर्षांखालील : * रोहिणी मोहिते : ४० किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी अमरावती) हिने सांगलीच्या ऐश्वर्या शेळके, अमरावतीच्या ऋतिका ढगे व फायनलमध्ये नागपूरच्या कल्याणी राऊतचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.
* राणी खोमणे : ४४ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ठाणेच्या प्रेरणा, नाशिकची गायत्री, कोल्हापूरची दिव्या व फायनल बाऊटमध्ये रागिनी मोहिते हिचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.
* महिमा गाडीलोहार : ४८ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ठाण्याच्या प्रेक्षा शहा, प्राजक्ता पाटील (सांगली) व फायनलमध्ये श्वेता मोरे (अमरावती) यांचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.
* स्नेहा खवरे : ५२ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने सलोनी वºहाडकर (रत्नागिरी),प्रियांका डोंगरे अमरावती व फायनल बाऊटमध्ये नूपुर चव्हाण कोल्हापूर हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.
* काजल औताडे : ६३ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने साक्षी रासकर (सातारा)
प्रांजल पुराणिक (ठाणे) व फायनलमध्ये मुंबईची राधिका
जेठवा हिचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.
हे सर्व खेळाडू पुणे येथील
क्रीडा प्रबोधिनीत मार्गदर्शिका
मधुश्री काशीद (देसाई) आणि अमरावती येथे मार्गदर्शक सतीश पहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सराव करतात.

ज्युनिअर वयोगट १८ ते २१ वर्षांखालील
* ४० किलो : साक्षी देशमुख : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने आॅल टू आॅल प्ले सिस्टीममध्ये ज्योती हेगडे (कोल्हापूर), सोनाली गोराळे (नाशिक), जिन्नत पठाण (गोंदिया), अनुश्री बहेकर (अमरावती) यांचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. * धनश्री वाडकर :४४ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने श्रद्धा गिरी (कोल्हापूर), हर्षा चौधरी (नाशिक) यांचा पराभव केला व फायनल बाऊटमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये नमिता नरसाळे (अ. नगर) हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. * कोमल मोकाशी : ४८ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ज्योती चटसे हिचा पराभव केला व सेमी फायनलमध्ये नाशिकच्या विद्या लोहार हिच्यासोबत खेळताना पराभव पत्करावा लागला व कांस्यपदकावर समाधान प्राप्त करावे लागले. * पूजा उरकुडे : ५२ किलो : रौप्य (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने पायल हुशारे (अमरावती) ऋतुजा वैद्य (जळगाव), रसिका सांगळे (पीडीजेए) यांचा पराभव केला व सोनाली मगदूम (कोल्हापूर) हिच्यासोबत फायनल बाऊटमध्ये खेळताना पराभव पत्करावा लागला व रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
* माधुरी घेरडे : ५७ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने कोमल सिद (पीजेए), गौरी पाटील (कोल्हापूर) व फायनलमध्ये शुभांगी राऊत (नागपूर) हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त
* त्वनीन तांबोळी : ७० किलो : (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने सृष्टी जीना (मुंबई) व आरती टकले हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. * प्रज्वल तळोकर (मुले) : ८१ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती)

Web Title:  The match for KP judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे