मसाले, भेंडी, गुलाब यांना अमेरिका, बहारीनच्या बाजारात डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:53 PM2018-03-12T18:53:52+5:302018-03-12T18:53:52+5:30

आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी पणन मंडळाने राज्यात ४४ सुविधा केंद्रांची उभारणी केली. त्या माध्यमातून डाळींब, केळी, आंबा, संत्रा ही फळे आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली आणि मिरची अशा भाज्यांची निर्यात करण्यात आली. 

Masala, Bhindi, Gulab, Demand in Market at US, Bahrain | मसाले, भेंडी, गुलाब यांना अमेरिका, बहारीनच्या बाजारात डिमांड

मसाले, भेंडी, गुलाब यांना अमेरिका, बहारीनच्या बाजारात डिमांड

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात २१ निर्यात केंद्र असून त्यात ३५ शीतगृह, १९ प्रशितकरण १९ आणि फळे पिकविण्याची ११ केंद्र आहेत२६ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २७६१.४१ टन शेतमाल जर्मनी, नेदरलँड, थायलंड, दोहा, बहारीन, अमेरिकेत निर्यात

पुणे : राज्यातून भेंडी, कारले, शेवग्यासह मसाले आणि गुलाब परदेशातील बाजारात दाखल झाले आहेत. पणन मंडळाच्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांत तब्बल २७६१.४१ टन शेतमाल अमेरिका, बहारीनसह अन्य देशांत निर्यात झाला आहे. 
राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठ मिळावी आणि निर्यातीत वाढ व्हावी या साठी राज्यात पायाभूत सुविधांची वाणवा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी पणन मंडळाने राज्यात ४४ सुविधा केंद्रांची उभारणी केली. त्या माध्यमातून डाळींब, केळी, आंबा, संत्रा ही फळे आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली आणि मिरची अशा भाज्यांची निर्यात करण्यात आली. 
राज्यात २१ निर्यात केंद्र असून त्यात ३५ शीतगृह, १९ प्रशितकरण १९ आणि फळे पिकविण्याची ११ केंद्र आहेत. शीतगृहांची क्षमता १ हजार ११९ टन, प्रशितीकरण ९५ आणि फळे पिकविण्याच्या केंद्राची २०० टन इतकी क्षमता आहे. आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राच्या शीतगृहांची क्षमता ५०० टन, प्रशितीकरण १०० टन, फुले निर्यात सुविधा केंद्राच्या शितृहांची क्षमता ३०० आणि प्रशितीकरणाची क्षमता ३० टन इतकी आहे. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, बाजार समित्या, वैयक्तिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही केंद्र चालविण्यात येतात. 
या सुविधा केंद्रावरुन २६ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २७६१.४१ टन शेतमाल जर्मनी, नेदरलँड, थायलंड, दोहा, बहारीन, अमेरिकेत निर्यात करण्यात आला आहे. या शिवाय मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगलोर या शहरातही या केंद्राच्या माध्यमातून भाजीपाला पाठविण्यात आला आहे. त्यात कांदा, बटाटा, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, गुलाब, फुले या शेतमालाचा समावेश आहे. त्यातून १ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांचा ७९६.१० टन शेतमाल पाठविला आहे. या केंद्रावर ४१२ कुशल आणि १ हजार ५०५ अकुशल अशा १ हजार ९१७ जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. यंदाच्या आंबा हंगामात पणन मंडळाच्या सुविधा केंद्रावरुन १ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

Web Title: Masala, Bhindi, Gulab, Demand in Market at US, Bahrain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.