तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:21 PM2018-04-21T15:21:00+5:302018-04-21T15:21:00+5:30

नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले.

marriaged with 27 years bigger person against her wishes , complaint registred | तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देतरुणीपेक्षा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत जबरदस्तीने विवाह नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे खोटे सांगितले.

पिंपरी : नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे सांगून १९ वर्षीय तरुणीला उस्मानाबाद जिल्हयातील तेरखेड या गावी नेण्यात येते. तिथे तरुणीपेक्षा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत तिचा जबरदस्तीने विवाह जमविण्यात आला. या प्रकरणी तरूणीने आई-वडिलांसह पंधरा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 याप्रकरणी दिप्ती गायकवाड (वय १९, रा. जुनी सांगवी) या तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आई अनिता गायकवाड (वय ३६), वडील दयानंद गायकवाड (वय ४६),  शामा मच्छिंद्र माने (वय ५४), मच्छिंद्र माने (वय ४६), रवी माने (वय २९) शामल रवी माने (वय २५ रा.पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (वय ३०), राहुल भांडळे (वय ३१,), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिप्तीचे लग्न तिला न विचारता ठरवण्यात आले. ते तिला मान्य नव्हते. नवºया मुलालाही पाहिलेले नव्हते. तरीसुध्दा त्या व्यक्तीशी लग्न करण्यास तरुणीने नकार दिला. मात्र, नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे खोटे सांगून दिप्ती यांना जबरदस्तीने गाडीत बसवुन उस्मानाबाद येथील तेरखेड गाव येथे नेण्यात आले. तिथे उत्तम विठ्ठल माने या ४६ वर्ष वयाच्या इसमाला नवरा मुलगा म्हणून पुढे आणले. 'नवरा मुलगा वडिलांपेक्षा मोठा दिसतो,त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्यास चौदा वर्षांची मुलगी देखील आहे. त्यामुळे त्याच्याशी लग्न करणार नाही,' असे दिप्तीने आपल्या पालकांना सांगितले.
त्यावेळी एका व्यक्तीने तो तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे.  तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे तिला धमकावले. नवरा मुलगा म्हणाला, मला मुलगा पाहिजे यासाठी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे. २२ मार्च २०१८ रोजी दीप्ती यांना आळंदी येथे जबरदस्तीने नेऊन लग्न लावून दिले. २० एप्रिलला दीप्ती यांनी सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: marriaged with 27 years bigger person against her wishes , complaint registred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.