लोणीकंद पोलीस ठाण्यावर मोर्चा, दंगलीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:47 AM2018-05-11T02:47:29+5:302018-05-11T02:47:29+5:30

१ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीची कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी होणारा रास्ता रोको पोलिसांनी परवानगी न दिल्याने झाला नाही.

March on Lonikand police station | लोणीकंद पोलीस ठाण्यावर मोर्चा, दंगलीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

लोणीकंद पोलीस ठाण्यावर मोर्चा, दंगलीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Next

लोणीकंद - १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीची कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी होणारा रास्ता रोको पोलिसांनी परवानगी न दिल्याने झाला नाही. मात्र, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाने पोलिसांना निवेदन देऊन आपल्या मागण्या केल्या.
झालेली दंगल हा पूर्वनियोजित कट असून प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावे, दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, दंगलीच्या कटाचे पुरावे नष्ट करणाºयांवर गुन्हे दाखल कारावे, रणस्तंभ अतिक्रमणमुक्त करावा, या त्यांच्या मागण्या होत्या.
रास्ता रोकोला परवानगी न मिळाल्याने आंदोलकांनी लोणी कंद पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढला. त्यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, लोणी कंदचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सचिन कडलग, राजेंद्र गवदे, सागर गायकवाड, विशाल
सोनवणे, प्रवीण म्हस्के, प्रफुल्ल आल्हाट, सिद्धार्थ गायकवाड, विजय हटाले, कुमार नितनवरे, सनी
कांबळे, वामन वाघमारे, मनोज शिरसाठ, संजय बडेकर, बापू गायकवाड, संतोष पटेकर, आकाश वढवराव, सुनील अवचर, नीलेश गायकवाड, मारुती कांबळे, नीलेश आल्हाट यांसह आदी मान्यवर सहभागी झाले होते.
तर यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी आंदोलकांना चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले आहे.

सलोखा निर्माण करा

दंगलीची झळ सर्व समाजातील नागरिकांना बसली आहे. आता बरीचशी परिस्थिती निवळली आहे. दोषींवर कायद्याने कार्यवाही होईल, कोणी विषय उकरुन काढू नये. समाजात शांतता सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- लताताई शिरसाठ,
अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी

शांतता भंग होईल, असे कृत्य कोणीही करू नये. मुंबई पोलीस अधिनियम कलम ६८ व ६९ कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १४५ आंदोलकास नोटीस देण्यात आली होती. जनजीवन विस्कळीत होईल, असे कोणीही कृत्य करू नये; अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन

Web Title: March on Lonikand police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.