माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:26 PM2019-02-21T17:26:28+5:302019-02-21T19:12:16+5:30

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

In the Maoist case, the second charge sheet is filed | माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

Next

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्णण गोन्साल्विस यांच्यासह फरार आरोपी गणपती यांच्या विरोधातील हे दोषारोपपत्र आहे. 

या प्रकरणात दाखल झालेले हे दुसरे दोषारोपपत्र आहे. या पूर्वी सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, ऍड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात नोव्हेबर 2018 मध्ये 5 हजार 160 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दलित समाजात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राम्हण केंद्रित अजेंडाच्या विरोधात गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्य्या माध्यमातून या प्रकरणात अटक आरोपींना केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्पपरिणाम असून सी सीपीआय पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भिमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे त्यात निष्णन्न झाले आहे. गणपती हा सीपीआय (माओवादी) या संघटनेचा माजी सचिव असून तो फरार आहे. तर इतर चार आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार या खटल्याचा तपास करीत आहेत. 

कोरेगाव -भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान या आघाडीने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचा मुख्य उद्देश सी.पी.आय (माओवादी) संघटनेच्या ई.आर.बी (ईरटर्न रिजन ब्युरो) या समितीच्या बैठकीत ठरलेल्या उद्दिष्टांची अंमलवाजावणी करण्याचा होता. या कटाच्या अनुषंगाने कोरेगाव-भिमा येथील कार्यक्रमाच्या संदर्भात सुधीर ढवळे यांच्याशी कॉ. मंगलू व कॉ. दिपु हे दोन महिन्यापासून समन्वय साधून राज्यभरातील दलित संघटनांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाल्याचे या पूर्वीच्या दोषारोपत्रातून निष्पन्न झाले आहे.

Web Title: In the Maoist case, the second charge sheet is filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.