मनरेगा योजना म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना : तुषार गांधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:41 PM2018-05-23T17:41:29+5:302018-05-23T17:41:29+5:30

मनरेगासारख्या शासकीय योजनांव्दारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहचविली जात आहे.

Manorega scheme making a factory of creation the Beggar : Tushar Gandhi | मनरेगा योजना म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना : तुषार गांधी 

मनरेगा योजना म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना : तुषार गांधी 

Next
ठळक मुद्देराष्ट्रपुरूषांमुळेच लोकशाहीचा पाया मजबूत ग्रामीण जनतेने धाडस आणि धारिष्ट्य गमावलेले

पुणे:- महात्मा गांधींनी खेड्यांच्या स्वावलंबनावर भर दिला होता. परंतु, खेड्यांना स्वावलंबनाकडे नेण्याऐवजी मनरेगासारख्या शासकीय योजनांव्दारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहचविली जात आहे. योजनेचे वर्णन करावयाचे झाल्यास भिकारी तयार करण्याचा कारखाना एवढीच होऊ शकेल, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी मनरेगा योजनेवरच ताशेरे ओढले. 
वक्तृवोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 'सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी' या विषयावरील पहिले पुष्प गांधी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, आतिक सय्यद, अन्वर राजन आदी मान्यवर उपस्थित होते. 
 गांधी म्हणाले, ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण सक्षमीकरणाऐवजी त्यांना ऐतखाऊ आणि आळशी बनविले जात आहे. त्यांच्या पंखांना ताकद देण्याएवजी त्यांना लाचार केले जात आहे. आज एकरांमध्ये जमीन असलेले शेतकरी, सुशिक्षित तरुण देखील मनरेगा आणि इतर सरकारी योजनांव्दारे मिळणा-या मानधनात समाधान मानत आहेत. त्या योजनांमध्ये काम करताना मिळणा-या मानधनाबाबत ते पूर्ण मिळावे याबाबत ते आग्रही नसतात. ठरलेल्या मानधनापेक्षा ठेकेदाराने कमिशनपोटी काही रक्कम कापून घेतल्यास त्यास विरोध करण्याचे धाडस आणि धारिष्ट्य देखील ग्रामीण जनता गमावून बसली आहे. भ्रष्टाचाराची अशा प्रकारची मुकसंमती किंवा स्वीकृती निंदनीय आहे. जनता देखील त्यांच्या स्वार्थार्पोटी अशा गोष्टी खपवून घेते सांभाळून घेते. अशा पद्धतीने जनतेची मानसिकता झाल्यास बापूंच्या स्वप्नातील किंवा त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताची आपण निर्मिती करु शकू का? असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. कार्याध्यक्ष भाई कात्रे यांनी आभार मानले. 
------------------------------------------------------------
राष्ट्रपुरूषांमुळेच लोकशाहीचा पाया मजबूत 
स्वातंत्र्यानंतर भारताने काय प्रगती केली असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यावर टीका करताना ते म्हणाले, इतक्या वर्षात जणू काही प्रगतीच झालेली नाही. ते न होण्याला पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार ठरवले जाते, हे चुकीचे आहे. नेहरु, डॉ. आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी भारतीय घटनेचा पाया मजबूत केला. आज भारतात लोकशाही व्यवस्था आस्तित्वात असण्याचे श्रेय या राष्ट्रपुरुषांनी मजबूत बांधलेल्या पायाला द्यावे लागेल.नाहीतर पाकिस्तान सारखे लष्कराच्या हातात नियंत्रण गेले असते. राष्ट्रपुरुषांचे हे योगदान असले तरी केवळ त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून तत्कालीन जागृक जनता जर्नादनच्या त्यागामुळे मिळाले. आज प्रजा आणि नेतृत्व त्यांच्या त्यांच्या स्वार्थार्पोटी राष्ट्रभक्तीला तिलांजली देत असल्याचा आरोप त्यांनी केला. 
............
'मर्यादपुरुषोत्तम' या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे.
 जी तत्वे आणि शुद्ध आचार-विचारांनी भारत ओळखला जायचा ती तत्वे आणि आचार-विचारांनी जगणारे राजकारणी आणि जनता राहिली आहे का हा प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याजोगा प्रश्न आहे. बापूंना ज्या प्रकारचे रामराज्य अपेक्षित होते त्याच्या अगदी विरुद्ध आपली वाटचाल सुरु आहे. ज्या रामाचे नाव घेऊन सरकार सत्तेत आले, त्यांनी तरी 'मर्यादपुरुषोत्तोम' या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे. आज कर्नाटकातील सत्ता मिळविण्यासाठी ज्या प्रकारे घोडेबाजाराला चालना, उत्तेजन दिले गेले, हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहत राहिली, अशा शब्दात त्यांनी जनतेलाही खडे बोल सुनावले.

Web Title: Manorega scheme making a factory of creation the Beggar : Tushar Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे