मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:16 AM2018-01-02T02:16:54+5:302018-01-02T02:17:06+5:30

राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली.

 Mandhardevi's journey started today | मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू

मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू

Next

भोर : राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली.
मांढरदेवीची काळुबाईची यात्रा १, २, ३ जानेवारी अशी आहे. त्यानिमित्त उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे व तहसीलदार वर्षा शिंगण यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे भरले आहेत. घाटातील दरडी, गवत काढून रस्ता रुंद करणे, रंगरंगोटी व रिफलेक्टर नामफलक लावण्यात आले आहेत. भोर-मांढरदेवी रस्त्यावर वाघजाईनगरजवळ व गोकवडी गावाजवळ अरुंद मोरी आहे तिचे रुंदीकरण न झाल्याने दुहेरी वाहातुकीस अडथळा येत असल्याने एकेरी वाहतूक करावी लागते आहे. त्या ठिकाणी वाहनचालकांच्या माहितीसाठी रिफलेक्टर लावण्यात आले आहेत. कापूरहोळ-मांढरदेवी दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ठाणगे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून आंबाडखिंड घाटाखाली एक आरोग्य पथक दिवस-रात्र ठेवण्यात आले आहे. भोर-आंबाडे गावापर्यंतच्या विहिरींच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे २५ जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. वाहनचालकांची तापासणी करून मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री केली जात असून नंतरच वाहने सोडली जात आहे. तर गाड्या भरल्या की, मांढरदेवीला पाठवल्या जातात, त्यासाठी स्पीकरवर जाहीर केले जात आहे. मात्र, भाविकच नसल्याने अनेक एसटी गाड्या स्टँडवर उभ्या आहेत.

पहिल्या दिवशी तुरळक गर्दी
सह्याद्री सर्च अँड रेसक्यु फोर्स, पुणे हे मांढरदेवी यात्रा काळात वाहतुकीचा खोळंबा, दर्शन रांगा लावण्यासाठी मदत करीत आहेत.

यात्राकाळात कोंबडी-बकरी कापता येत नाही. मद्यपान करता येत नाही, ढोल वाजवणे, अंगात आणणे करता येत नसून पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. त्यामुळे यात्रा काळात फारसे भाविक मांढरदेवीला येत नाहीत, तर यात्राकाळ संपल्यावर मंगळवार व शुक्रवारी एकच गर्दी करतात.

Web Title:  Mandhardevi's journey started today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.