शॉर्टकट बेतला जीवावर : रूळ ओलांडताना मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:47 PM2019-01-31T18:47:15+5:302019-01-31T18:54:28+5:30

चालत पादचारी पूल किंवा रस्त्याचा वापर न करता रूळ ओलांडणे जीवावर बेतले असून मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा रेल्वेच्या धडकेत जागेवर मृत्यू झाला आहे.

man dashed by railway while crossing railway line | शॉर्टकट बेतला जीवावर : रूळ ओलांडताना मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा मृत्यू 

शॉर्टकट बेतला जीवावर : रूळ ओलांडताना मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा मृत्यू 

पुणे : चालत पादचारी पूल किंवा रस्त्याचा वापर न करता रूळ ओलांडणे जीवावर बेतले  असून मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा  रेल्वेच्या धडकेत जागेवर मृत्यू झाला आहे. काल घडलेल्या या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख गुरुवारी पटली असून संजय बाबासाहेब शिंदे (वय ३१)  असे या व्यक्तीचे नाव आहे. ते बिगारी काम करायचे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, संजय यांचे पत्नीसोबत तणावाचे असल्यामुळे ते कुटुंबासोबत राहत नव्हते. बुधवारी संध्याकाळी ते पत्नी  मुलगी योगेश्वरीला भेटायला मोरेवाडीतील जवळील लालटोपीनगर येथे गेले होते. त्यानंतर ते काळेवाडी येथे राहणाऱ्या बहिणीकडे मुक्कामाला  होते. मात्र पिंपरी रेल्वेस्थानक रूळ ओलांडताना त्यांना  पुणे-मुंबई इन्टरसिटी एक्सप्रेसने  धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ते जवळपास दहा फूटावर उडून पडले. या धडकेत संजयचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वेळ आणि शारीरिक कष्ट वाचवण्याच्या प्रयत्नात जीव गेल्याचे समोर आले असून आता तरी नागरिकांनी शॉर्ट कट मारू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले. 

Web Title: man dashed by railway while crossing railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.