''mamachya gavala jauya'' event for drought affected children | दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी ''मामाच्या गावाला जाऊया'' उपक्रम
दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी ''मामाच्या गावाला जाऊया'' उपक्रम

पुणे : अंघाेळीची गाेळी या संस्थेतर्फे दरवर्षी चला मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमांतर्गत दुष्काळी भागातील लहान मुलांना पुण्याची सफर घडविण्यात येते. यंदा साईआश्रया शिर्डी संस्थेतील 25 मुले- मुली पुण्यात आली आहेत. 4 ते 8 मे या काळात ते पुण्यातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. या काळात त्यांच्यासाठी विविध कार्यशाळेचे देखील आयाेजन करण्यात आले आहे. 

अंघाेळीची गाेळी या संस्थेतर्फे दरवर्षी मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबविण्यात येताे. दुष्काळी भागातील लहान मुलांनी तेथील दुष्काळ विसरुन काही दिवस पुण्यात आनंदात घालवावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यंदा शिर्डी येथील लहानमुले पुण्याची सफर करण्यासाठी आले आहेत. या उपक्रमाबाबात बाेलताना अंघाेळीची गाेळी या संस्थेचे माधव पाटील म्हणाले, 'चला मामाच्या गावाला जाऊया' या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून यापुर्वी बीड जिल्हा तसेच अकोला तालुक्यातील मुलांनी पुण्याला भेट दिली आहे. यावेळी साईआश्रया शिर्डी येथील मुले आली असून त्यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे ५ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ऐतिहासिक स्थळांना भेटी, उद्यानभेटी, संग्राहालय भेटी आणि शैक्षणिक संस्थांच्या भेटींचा समावेश आहे. तसेच या मुलांना विविध क्षेत्रातील दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. या विद्यार्थ्यांचा मुक्काम विद्यार्थी सहाय्यक समिती, सेनापती बापट रोड पुणे येथे आहे. 

या उपक्रामाच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांनी मुलांना चित्रकलेचे धडे दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक सुंदर चित्रं रेखाटली होती. आज या मुलांनी सिंहगड आणि कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. 

मराठवाडा मित्र मंडळचे भाऊसाहेब पाटील तर  विद्यार्थी सहाय्यक समितीचे प्रभाकर पाटील या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. तर रुपाली पाटील, विकास उगले, तुषार डुकरे, अमोल बोरसे, माधव पाटील, गणेश साळगावकर, गणेश सातव, जोत्स्ना पाखरे, अदवय पाटील, हिरकणी पाटील, पल्ल्वी वाघ आणि शरद बोदगे संयोजक म्हणुन काम पहात आहेत.


Web Title: ''mamachya gavala jauya'' event for drought affected children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.