अभिमानास्पद !! महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:50 PM2018-11-24T15:50:40+5:302018-11-24T15:52:28+5:30

राज्याच्या पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके जाहीर झाली अाहेत.

maharashtra police wireless dept got 2 prestigious awards | अभिमानास्पद !! महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके

अभिमानास्पद !! महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके

Next

पुणे : महाराष्ट्र पाेलीस हे देशात उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत असल्याबद्दल व गाेपनियता राखण्यासाठी सर्वात सुरक्षित तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल ची प्रथम क्रमांकाची सर्वात मानाची असलेली दाेन पारिताेषिके महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला जाहीर झाली अाहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पाेलीस प्रमुख संवाद संमेलनात ही पारिताेषिके प्रदान करण्यात अाली. विज्ञान भवन येथे 19 व 20 नाेव्हेंबर राेजी पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री संताेष गंगवार यांच्या हस्ते राज्याचे बिनतारी संदेश (वायरलेस) विभागाचे अपल पाेलीस महासंचालक व संचालक रितेश कुमार यांनी ही पारिताेषिके स्विकारली.

    डिजीटल दळणवळण प्रणाली, उपग्रह अाधारित दळणवळण यंत्रणा अाणि डिजीटल रिडिअाे ट्रकिंग प्रणाली अशा सर्व अत्याधुनिक यंत्रणाचा यशस्वीरित्या वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील सद्यस्थितीतील प्रथम क्रमांकाचे राज्य अाहे. तंत्रज्ञानातील बदलाच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण इनाेव्हेशन हबची निर्मिती करण्यात येत अाहे. अत्याधुनिक उपग्रह दळणवळण यंत्रणा, ई-लर्निंग व डिजिटल क्लासरुम मध्ये कार्यकारी दलातील पाेलीस अधिकारी व कर्मचारी तसेच इतर राज्य पाेलीस दलातील 250 पाेलीस प्रशिक्षणार्थींसाठी बदलत्या तंत्रज्ञानाबराेबरच अत्याधुनिक सुविधायुक्त सायबर लॅब, व्हर्च्युअल क्लासरुम (निवास व्यवस्थेसह) हे उपक्रम प्रगतीपथावर असून रितेश कुमार यांच्या कल्पना व पुढाकारातून या नाविन्यपूर्ण याेजना पूर्णत्वास येत अाहेत. 

    या दाेन्ही पुरस्कारांचे श्रेय रितेश कुमार यांनी पाेलीस बिनतारी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकनिष्ठ, प्रामाणिक व अथक प्रयत्नास दिले. 

Web Title: maharashtra police wireless dept got 2 prestigious awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.