महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; अनिल अवचट यांना जीवनगौैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:00 AM2017-12-22T07:00:01+5:302017-12-22T07:00:19+5:30

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना

Maharashtra Foundation announces the award; Lifting life to Anil Avchat | महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; अनिल अवचट यांना जीवनगौैरव

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; अनिल अवचट यांना जीवनगौैरव

Next

पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार अरविंद गुप्ता यांना दिला जाईल. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल.
याशिवाय, सई परांजपे यांच्या ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. अजित दळवी यांना ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती विनोद शिरसाठ, मुकुंद टाकसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षासाठी एकूण ९ पुरस्कार दिले जाणार असून, त्यात साहित्यासाठी चार, समाजकार्यासाठी चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. समाजकार्यासाठी असंघटित कष्टकºयांसाठी केलेल्या कामासाठी साताºयातील चेतना गाला सिन्हा, मुस्लिम महिलांच्या प्रबोधनासाठी नागपूरच्या रुबिना पटेल, भटके विमुक्त व दलितांसाठी केलेल्या संघर्षासाठी अहमदनगर येथील अरुण जाधव यांना गौैरवण्यात येईल. या पुरस्कारांचे संयोजन केशव गोरे स्मारक ट्रस्ट व साधना ट्रस्ट यांनी संयुक्तपणे केले आहे.

Web Title: Maharashtra Foundation announces the award; Lifting life to Anil Avchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे