ठळक मुद्देशुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदअनेक शहरांतील किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशापर्यंत घट

पुणे : राज्यात मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, शुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यातही किमान तापमानात उल्लेखनीय घट झाल्याने गारवा वाढला आहे.
काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात घट होत चालली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पारा झपाट्याने खाली येवू लागला आहे. अनेक शहरांतील किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशापर्यंत घट झाली आहे. सोलापूर शहराचे सरासरी तापमान ४.९ अंशांनी, तर अहमदनगरचे तापमान ४.५ अंशांनी खाली आले आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. उस्मानाबादमध्ये शुक्रवारी १२.५ अंश तापमानाची नोंद झाली. शहराचा किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी उतरला. परभणी शहरातही थंडी वाढू लागली असून सरासरी तापमानात ४.३ अंशांनी घट झाली. विदर्भातील बहुतेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. 

प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई २४.२, रत्नागिरी २१.७, पुणे १३.४, अहमदनगर १२.५, जळगाव १३, कोल्हापूर १७.९, महाबळेश्वर १४.५, मालेगाव १४.८, नाशिक १६.४, सातारा १५, सांगली १६.४, सोलापूर १४.४, उस्मानाबाद १२.५, औरंगाबाद १४.६, परभणी १३.९, नांदेड १६, अकोला १६, गोंदिया १५, नागपूर १४.४.